मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

''मुंबईची तुंबई झाली, जबाबदार कोण मुख्यमंत्री की पालिका?'', भाजपचा सवाल

''मुंबईची तुंबई झाली, जबाबदार कोण मुख्यमंत्री की पालिका?'', भाजपचा सवाल

पहिल्या पावसातच मुंबईची (Mumbai Rain) तुंबई झालेली पाहायला मिळाली. भाजप नेते प्रवीण दरेकर  (pravin darekar ) यांनी मुंबई पालिकेच्या कामांवर ताशेरे ओढले आहेत.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 09 जून: आज पावसानं मुंबई (Mumbai Rain) ला चांगलंच झोडपून काढलं आहे. पहिल्या पावसातच मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी (Rain Alert) पाणी साचल्याच्या घटना घडल्या. या पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. रेल्वे सेवा ठप्प झाली तर मुंबईच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. बस सेवेलाही याचा फटका बसला. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी मुंबई पालिकेच्या कामांवर ताशेरे ओढले आहेत. मुंबईमध्ये पाणी भरले असल्यामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली असल्याचं प्रवीण दरेकर म्हणालेत.

गेल्यावेळी शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी मुंबईत भरणाऱ्या पाण्याला मुख्यमंत्री जबाबदार राहतील असे सांगितले होते. मग आता त्यांनी सांगावं मुंबईमध्ये साचलेल्या पाण्याला जबाबदार कोण ? , असा सवालही दरेकरांनी उपस्थित केला आहे. आज झालेल्या तुंबईला जबाबदार कोण मुख्यमंत्री की मुंबई महापालिका?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

पूर्णपणे नियोजनाचा अपयश झालं असून प्रकल्प वेळेमध्ये झालेले नसल्याचा आरोपही दरेकरांनी केला आहे. हायटाईड आणि मुसळधार पाउस आला असल्यामुळे पाणी तुंबलं असल्याचं वक्तव्य सत्ता धारी करत आहे. 20- 25 वर्ष हायटाईड आणि मुसळधार पाऊस येत असल्यामुळे मुंबईकरांसाठी हे नवीन नाही, असं म्हणत प्रवीण दरेकरांनी राज्य सरकारला टोमणा मारला आहे.

हेही वाचा- राहुल गांधींना मोठा झटका, बड्या नेत्याचा काँग्रेसला रामराम

आतातरी मुंबईची तुंबई झाली असल्याची जबाबदारी महापालिकेने घ्यावी आणि तात्काळ कडक गतिमान योजना करावी. तसंच मुंबईकरांना या तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था करावी आणि जनजीवन सुरळीत करावे, अशी विनंतीही प्रवीण दरेकरांनी पालिकेला केली आहे.

First published:

Tags: Mumbai muncipal corporation, Mumbai rain, Pravin darekar