'पोलिसांना सोडून संघर्षाला या, जशास तसे उत्तर देऊ' प्रसाद लाड यांचे अनिल परबांना खुले आव्हान

भारतीय जनता पक्षाचे नेते प्रसाद लाड यांनी शिवसेनेचे नेते अनिल परब यांना ठणकावत एक आव्हान दिलं आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते प्रसाद लाड यांनी शिवसेनेचे नेते अनिल परब यांना ठणकावत एक आव्हान दिलं आहे.

  • Share this:
    मुंबई, 18 जून: राम मंदिराच्या जमीन खरेदी प्रकरणावरुन शिवसेनेने केलेल्या टीकेनंतर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांत चांगलाच राडा (Shiv Sena BJP clash) झाला. मुंबईतील शिवसेना भवनासमोर (Shiv Sena Bhavan) दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पहायला मिळालं. हा वाद अगदी पोलीस स्टेशनपर्यंतही पोहोचला. दोन दिवस उलटल्यानंतरही शिवसेना भाजपमधील हा वाद काही शमलेला दिसत नाहीये. प्रसाद लाड यांचे अनिल परबांना आव्हान भाजपच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देणारे शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी पोलिसांच्या मागे लपून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करणे सोडावे. त्यांनी पोलिसांना सोडून समोरासमोर यावे, त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, अशा शब्दात महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी परब यांना ठणकावले आहे. आम्ही जशाच तसे उत्तर देवू दोन दिवसांपूर्वी सेना भवन येथे भाजप कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीप्रकरणी अनिल परब यांनी चिथावणीची भाषा केली आहे. शुक्रवारी परब यांनी भाजप कार्यकर्त्यांना इशारा देणारी भाषा वापरत ‘आम्ही भाजप कार्यकर्त्यांना ठीक करू,’ असा दम दिला आहे. त्यावर बोलताना लाड म्हणाले, “मी परब यांना सांगू इच्छितो की त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करू नये. परब आणि शिवसेना पोलिसांच्या आड लपून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करत आहेत. परब साहेबांना मी सांगू इच्छितो की त्यांनी पोलिसांना सोडून समोर यावे आणि संघर्ष करावा. त्यांना मग आम्ही जशाच तसे उत्तर देवू,” असेही लाड यांनी पुढे म्हटले आहे. शिवसैनिकांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंकडून शाबासकीची थाप बुधवारी (16 जून 2021) शिवसेना भवनासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी चोप दिल्यानंतर आज झालेली ही भेट वेगळेच संकेत देत आहेत. या भेटीने एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांनी केलेल्या कृत्याचे समर्थन केल्याचं दिसून येत आहे. कुणी अंगावर आले तर शिंगावर घ्या या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी प्रमाणे शिवसैनिकांनी कृती केल्याने उद्धव ठाकरे यांनीही शिवसैनिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published: