• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • भाजप प्रदेश कार्यकारिणीची आज मुंबईत बैठक

भाजप प्रदेश कार्यकारिणीची आज मुंबईत बैठक

आज मुंबईत भाजपच्या कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीत मुख्यमंत्री चार वाजता भाषण करतील.

  • Share this:
मुंबई, प्रतिनिधी, 17 ऑगस्ट : भाजपच्या मंत्र्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावरच्या आरोपांची मालिका सुरूच आहे. या पार्श्वभूमीवरच आज मुंबईत भाजपची राज्य कार्यकरिणीची बैठक सुरू झाली आहे. भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मंत्री यांच्यात समन्वय नाही, याबाबत पदाधिकारी यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या परिस्थितीत रावसाहेब दानवे आणि सुभाष देशमुख तसंच प्रकाश मेहता यांच्या बाबत काही निर्णय होतो का याकडे लक्ष लागलय. अशा परिस्थितीतही मीरा भाईंदर आणि नांदेड वाघाळा महापालिका जिंकणारच असा दावा रावसाहेब दानवे यांनी प्रदेश कार्यकार्यकारिणीत केलाय. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्आर फडणवीस यांच्यासह इतर मंत्रीही या बैठकीत सहभागी आहेत दरम्यान, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी प्रदेश कार्यकारिणीला हजर राहण्याऐवजी अमित शहांच्या भेटीसाठी दिल्ली गाठलीय. केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचवण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अमित शाह यांनी काही केंद्रीय मंत्री आणि राज्यांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावलीय. या बैठकीत रवीशंकर प्रसाद, निर्मला सीतारमण, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान हे मंत्री तर राम माधव, मुरलीधर राव, सौदान सिंह, अनिल सिंह हे पक्षाचे केंद्रीय पदाधिकारी सहभागी आहेत. यासोबतच भाजपाशासित राज्यांचे प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित आहेत. आशिष शेलारांचाही त्यात समावेश आहे.
First published: