शिवसेनेला धक्का देण्यासाठी 'मनसे'च्या मोर्चाला भाजप देणार साथ

शिवसेनेला धक्का देण्यासाठी 'मनसे'च्या मोर्चाला भाजप देणार साथ

घुसखोरांविरूद्ध मोर्चा काढून राज ठाकरे हे शक्तिप्रदर्शन करणार असून भाजपची साथ मिळाल्याने आता राजकीय सामनाही रंगण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई 6 फेब्रुवारी : मुंबईतल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावा या मागणीसाठी 'मनसे' 9 फेब्रुवारीला मुंबईत मोठा मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आता भाजप कामाला लागलं असून मनसेच्या मोर्च्यात भाजपचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात येत्या रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचा मोर्चा निघणार आहे. मनसेच्या महाशिबिरातच राज ठाकरेंनी त्याबाबत घोषणा केली होती. शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजप आता मनसेला मदत करणार असल्याचं बोललं जातंय.

मनसेच्या या मोर्च्यात भाजपचे कार्यकर्ते देखील सहभागी होणार आहेत.

तसे आदेशच भाजप नेत्यांकडून भाजपच्या मुंबईतील कार्यकर्त्याना देण्यात आले आहेत. याच मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप आमदार आशिष शेलार यांची भेट झाल्याची माहिती मिळत असून, भाजपने या मोर्च्याला अधिक बळकटी मिळावी यासाठी आपल्या कार्यकर्त्याना मोर्चात सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत.  दरम्यान या मोर्च्यात भाजपच्या नेत्यांनी सहभागी व्हायचे की नाही हे अजून ठरलेले नसून, भाजपचे मुंबईचे कार्यकर्ते मात्र मनसेच्या मोर्च्यात सहभागी होणार आहेत.

उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्याआधी शिवसेना नगरसेवकांची राजीनाम्याची धमकी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 23 जानेवारीच्या महामेळाव्यात पाकिस्तानी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कडक भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर राज यांचा CAA आणि NRCला पाठिंबा आहे असं बोललं जात होतं. घुसखोरांविरुद्ध मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणाही त्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांनी आज कृष्णकुंजवर बैठक घेतली.

'शरद पवारांवर ठाकरे सरकार मेहेरबान, संस्थेला दिली 51 हेक्टर जमीन'

त्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. या बैठकीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज यांना नव्या भूमिकेवरून उपस्थित होत असल्याचं सांगितलं त्यावर राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं. मोर्चा हा CAA आणि NRCच्या समर्थनासाठी नाही असं त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. यावर चर्चा होऊ शकते मात्र समर्थन होऊ शकत नाही असंही त्यांनी सांगितलं.

First published: February 6, 2020, 2:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या