भाजप पदाधिकाऱ्याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

भाजप पदाधिकाऱ्याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

आरोपी भाजपचा कल्याण शहर जिल्हा उपाध्यक्ष आहे. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून, ठार मारण्याची धमकी देत आरोपी तब्बल चार वर्षांपासून बलात्कार करत असल्याची तक्रार पीडितेने दिली आहे. रिव्हॉल्व्हर आरोपीकडून पोलिसांनी जप्त केली आहे.

  • Share this:

प्रदीप भनगे (प्रतिनिधी)

कल्याण, 17 ऑगस्ट- भाजपच्या पदाधिकाऱ्याविरद्ध मानपाडा (डोंबिवली पूर्व, जि.ठाणे) पोलिस स्टेशनमध्ये बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 (पोस्का) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप गोपीनाथ माळी (वय-41, रा.भोपरगाव, डोंबिवली-पूर्व) असे आरोपीचे नाव असून मानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आरोपी भाजपचा कल्याण शहर जिल्हा उपाध्यक्ष आहे. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून, ठार मारण्याची धमकी देत आरोपी तब्बल चार वर्षांपासून बलात्कार करत असल्याची तक्रार पीडितेने दिली आहे. रिव्हॉल्व्हर आरोपीकडून पोलिसांनी जप्त केली आहे.

का आहे हे प्रकरण?

आरोपी संदीप माळी याने पीडितेला चार वर्षांपूर्वी मैत्रीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्याच्याशी मैत्री करण्याची पीडितेची इच्छा नव्हती. तिने त्याच प्रस्ताव फेटाळला. यामुळे संतापलेल्या आरोपीने पीडितेला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवला. तिला ठार मारण्याची धमकी दिली. वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध जबरी संभोग केल्याचे पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जुलै 2015 ते 16 ऑगस्ट 2019 या चार वर्षांत अभिनव शाळेकडून सांगावकडे जाणारा रस्ता, एमआयडीसी, फॅक्टरी रोड, कुशाला लॉज (कल्याण-शिळ रोड) व इतर ठिकाणी आरोपीने पीडितेवर अनेकदा बलात्कार केला.

मानपाडा पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन आरोपी संदीप माळी याला अटक करून त्याच्या विरोधात भादंवि कलम 376, 354, 323, 506, 502 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 (पोस्का) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादाहरी चौरे हे पुढीस तपास करत आहे.

डॉन आहे का तू? पोलिसांनी तरुणाला पट्ट्याने झोड-झोडपलं, VIDEO व्हायरल

Published by: Sandip Parolekar
First published: August 17, 2019, 6:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading