घुसखोरांना बाहेर काढा म्हणणाऱ्या शिवसेनेच्या तोंडाला सत्तेमुळे कुलूप - फडणवीस

घुसखोरांना बाहेर काढा म्हणणाऱ्या शिवसेनेच्या तोंडाला सत्तेमुळे कुलूप - फडणवीस

हिंसाचार करणाऱ्यांना मोर्चाची परवानगी दिली जाते आणि आम्ही संविधानाचा सन्मान करणारे असताना परवानगी नाकारली जाते अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.

  • Share this:

मुंबई 28 डिसेंबर : CAA कायद्याच्या समर्थनासाठी भाजप आणि काही संघटनांनी संविधान सन्मान मंचच्या वतीने मोर्चाचं आयोजन केलं होतं. भाजप प्रणित सर्व संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटी पर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार होता पण या मोर्चाला परवानगी नाकारल्याने या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. या मोर्चात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे आमदार आणि खासदार उपस्थित होते. सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेची आत्तापर्यंती भूमिका ही घुसखोरांना मुंबईतून हाकललं पाहिजे अशी होती. बाळासाहेब ठाकरे यांनीही तीच भूमिका घेतली होती. मात्र सत्तेसाठी हपापलेल्या शिवसेनेच्या तोंडाला सत्तेमुळे कुलूप लागलंय अशी टीकाही त्यांनी केली. सावकरांचा अपमान करणाऱ्या पक्षांना जनता माफ करणार नाही अशी टीकाही त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर केली.

फडणवीस म्हणाले,  CAAच्या मुद्यावरून काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी अप प्रचार सुरू केलाय. देशात आणि समाजात हिंसाचार व्हावा असाच त्यांचा उद्देश होता. या मुद्यावरून त्यांनी पेटवा पेटवी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आलं नाही. मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याच्या मुद्यावरूनही ते पोलिसांवर चांगलेच भडकले. हिंसाचार करणाऱ्यांना मोर्चाची परवानगी दिली जाते आणि आम्ही संविधानाचा सन्मान करणारे असताना परवानगी नाकारली जाते अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.

उद्धव ठाकरे जे जेवतात ते दहा रुपयात मिळणार का? नारायण राणेंचा हल्लाबोल

राष्ट्रीय नागरिकत्व कायद्याच्या विरोधात संपूर्ण देशात आगडोंब उसळलेला असतानाच त्याला टक्कर देण्यासाठी आता सत्ताधारी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते देखील मैदानात उतरले आहेत. याची सुरुवात काही दिवसांपूर्वी ठाण्यातून एक प्रचंड जनफेरी काढून करण्यात आली.  देशहीत आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहात सदर कायदा संख्याबळाच्या जोरावर संमत करून घेण्यात आला.

भाजप आमदाराची अजब मागणी, पोलिस नको आणि स्टेशनही नकोत, बंदूक द्या

सदर कायद्यामुळे देशात असलेल्या मुस्लीम समाजावर अन्याय होत असल्याचे  सांगत मुस्लिम संघटना आणि इतर बुद्धिवाद्यांनी देशात आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. गेले अनेक दिवस चाललेल्या या संघर्षाला अनेक ठिकाणी हिंसेचे गालबोट देखील लागले होते. या कायद्याबद्दल जनजागृती व्हावी आणि सदर कायद्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज ठाण्यातील भाजप आणि ठाणेकरांनी मिळून विशाल जनफेरीचे आयोजन केले. देशभर अशाच मोर्चांचं आयोजन भाजप करणार आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2019 06:45 PM IST

ताज्या बातम्या