Home /News /mumbai /

महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यावरून भाजपने केला खुलासा, विरोधकांना केला सवाल

महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यावरून भाजपने केला खुलासा, विरोधकांना केला सवाल

राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार आहे

    मुंबई, 02 जानेवारी : राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला राजपथावर होणाऱ्या  परेडमध्ये यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचा समावेश नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. या वादावर आता भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून विरोधाकांचा आरोपांना उत्तर देण्यात आलं आहे. दरवर्षी 32 राज्यांकडून प्रवेशिका मागविल्या जातात. त्यापैकी 16 राज्यांची निवड होते. केंद्र सरकारचे 8 मंत्रालय असे दरवर्षी केवळ 24 चित्ररथ असतात. वेगवेगळ्या राज्यांना प्रतिनिधित्त्व मिळावे, म्हणून रोटेशन पद्धतीने निवड होते. महाराष्ट्राला यापूर्वी अनेकदा प्रतिनिधित्त्व नव्हते.1972, 1987, 1989, 1996, 2000, 2005, 2008, 2013, 2016. ही वर्ष पाहिली तर दोन अपवाद वगळता केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचेच सरकार होते,  असा खुलासा भाजपकडून करण्यात आला आहे. तसंच, जर अस असेल तर आताच चित्ररथाला परवानगी न दिल्यामुळे पंतप्रधान  मोदी यांना महाराष्ट्र-पं.बंगाल वगळले, अशी टीका आताच का? असा सवालही विचारण्यात आला. दरम्यान, राजपथावरील परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ हा कायम लक्षवेधी ठरतो. अनेकदा या चित्ररथाला पुरस्कारही मिळालाय. मात्र, यावर्षीच्या परेडमध्ये राज्याचा चित्ररथ दिसणार नाही. केंद्र सरकारने सूडबुद्धीने परवानगी दिली नसल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. हा देशाचा उत्सव असून विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांना ही सापत्न वागणूक असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली. हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे. परंतु, सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावली आहे. या राज्यांना परवानगी नाकारण्याची कृती हा येथील जनतेचा अपमान आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा जाहिर निषेध अशी टीकाही त्यांनी केलीय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलंय. ते म्हणाले, महाराष्ट्र आणि प.बंगालचे चित्ररथ यावेळी प्रजासत्ताक दिनी दिसू नयेत या मागे राजकिय षडयंत्र आहे काय आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का? महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात नेहमीच देशाचे आकर्षण ठरत आला. अनेकदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती. आज गप्प का? तर केंद्र सरकारने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. राजपथावर ज्या चित्ररथांना परवानगी देण्यासाठी केंद्राची एक तज्ज्ञ समिती असते. ही समिती विविध राज्य आणि केंद्राच्या मंत्रालयाकडून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून त्यांना परवानगी देत असते.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या