मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /भाजपने मला 100 कोटींची ऑफर दिलेली, शशिकांत शिंदेंच्या वक्तव्यावर प्रविण दरेकर म्हणाले...

भाजपने मला 100 कोटींची ऑफर दिलेली, शशिकांत शिंदेंच्या वक्तव्यावर प्रविण दरेकर म्हणाले...

फाईल फोटो

फाईल फोटो

भाजपने आपल्याला 100 कोटींची ऑफर दिल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (NCP MLA Shashikant Shinde) यांनी केला आहे.

मुंबई, 20 ऑक्टोबर : भाजपने आपल्याला ऑफर दिल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षात यावं यासाठी भाजपने (BJP) आपल्यायाला तेव्हा 100 कोटी रुपयांची ऑफर (BJP offer 100 crore rupees to NCP MLA) दिली होती असं वक्तव्य पुन्हा एकदा शशिकांत शिंदे यांनी केलं आहे. काही महिन्यांपूर्वी देखील शशिकांत शिंदे यांनी हा दावा केला होता. त्यानंतर आता पुन्हा हा दावा केल्याने भाजपकडून यावर प्रतिक्रिया आली आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शशिकांत शिंदेला 100 कोटींची ॲाफर भाजप देईल असे मला वाटत नाही. चर्चेत राहाण्यासाठी हे त्यांचे स्टंट आहे अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिली आहे.

काय म्हणाले होते शशिकांत शिंदे

साताऱ्यात एका कार्यक्रमात भाषण करताना शशिकांत शिंदे म्हणाले, भारतीय जनता पक्षाचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की ते आजही माझ्यावर तेवढचं प्रेम करतात. मला असं वाटतं की त्यावेळी 100 कोटी रुपये घेतले असते तर बरं झालं असतं. पण त्यांना माहिती नाहीये की, मी शरद पवार यांचा निष्ठावंत पाईक आहे. मेलो तरी शरद पवार यांना मी सोडणार नाही.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मला 100 कोटींची ऑफर दिलेली. पण मी ही ऑफर धुडकावून लावली होती. मी कधीच शरद पवारांची साथ सोडणार नाही असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलं.

वाचा : शिवसेना आमदाराने केलं नरेंद्र मोदी अन् देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक

ईडीच्या कारवाईवरही शशिकांत शिंदे संतापले

अजित पवारांच्या बहिणीच्या घरावर आयकर विभागाने झाडाझडती घेतली. तसेच अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यावर आयकर विभाग आणि ईडीकडून चौकशी सुरू आहे. यावर भाष्य करताना शशिकांत शिंदे म्हणाले, ईडीला पळवणारे आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत. आपण परिणामांचा विचार करत नाही. सध्याच्या राजकारणात असलेल्या भाजपच्या ईडीला आणि बाकी सीडीला पळवून लावणारे कुणी कार्यकर्ते असतील तर ते आमच्यासारखे. मध्ये किरीट सोमय्या आले होते. मी अजित पवारांना म्हटलं होतं की मला परवानगी द्या त्याचा तोतरेपणा बाहेर काढतो. काय आहे आपण परिणामांना घाबरत नाही. ईडी आणि आयकर विभागाच्या बापालाही आपण घाबत नाही.

First published:

Tags: NCP, Pravin darekar, Shashikant shinde