Home /News /mumbai /

अवघ्या काही सेकंदात भाजपचे आंदोलन पोलिसांनी गुंडाळले, प्रवीण दरेकरांसह कार्यकर्ते ताब्यात

अवघ्या काही सेकंदात भाजपचे आंदोलन पोलिसांनी गुंडाळले, प्रवीण दरेकरांसह कार्यकर्ते ताब्यात

10 च्या सुमारास प्रवीण दरेकर आले आणि त्यांनी चक्का जाम आंदोलनलाला सुरुवात केली आणि लगेच पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले.

  ठाणे, 26 जून :  स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ओबीसी आरक्षण ( obc reservation) रद्द करण्यात आल्यामुळे भाजपाने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन करत आहे.  ठाण्यात देखील भाजपातर्फे चक्का जाम आंदोलन (bjp obc chakka jam protest) करण्यात आले होते. पण आंदोलन सुरू होण्याआधीच भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (praveen darekar) यांना पोलिसांनी ताब्यात घेतली. (bjp protest against obc reservation) मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर ज्ञानसाधना कॉलेजजवळ भाजपच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. काही सेकंदच पोलिसांनी हे चक्का जाम आंदोलन होवू दिले. या नंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांच्यासह सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. ‘...तर वॉर्नर-मॅक्सवेल T20 वर्ल्ड कपमधून आऊट’, ऑस्ट्रेलियन कॅप्टनचा गंभीर इशारा आज सकाळी ठीक 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली त्या आधी 9 वाजल्यापासून भाजपा कार्यकर्ते आंदोलन स्थळी जमायला सुरुवात झाली होती. 10 च्या सुमारास प्रवीण दरेकर आले आणि त्यांनी चक्का जाम आंदोलनलाला सुरुवात केली आणि लगेच पोलिसांनी अवघ्या काही सेकंदात आंदोलकांना ताब्यात घेतले. अहमदनगर शहरात चक्काजाम आंदोलन दरम्यान, अहमदनगरमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप अधिकच आक्रमक झाले असून राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही  ओबीसींच्या आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आली आहे. लिंकद्वारे ऑनलाइन क्लासमध्ये घुसून मुलीला अश्लील भाषेत शिवीगाळ; भाईंदरमधील घटना अहमदनगर शहरात माजी मंत्री भाजप नेते राम शिंदे यांच्या  नेतृत्वाखाली आज अहमदनगर शहरातील सक्कर चौकात भाजपाच्या वतीने आंदोलन करून चक्का जाम करण्यात आला. या आंदोलनाला भाजपचे खासदार सुजय विखे आणि शिवाजीराव कर्डीले हे ही उपस्थित होते. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगर शहरातील मुख्य चौकात आंदोलन केल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: BJP

  पुढील बातम्या