स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा नाहीच, ही आहे भाजपची नवी 'रणनीती'

स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा नाहीच, ही आहे भाजपची नवी 'रणनीती'

चर्चेची दारं शिवसेनेकडून बंद असल्याने भाजप प्रतिसादासाठी शेवटच्या क्षणापर्यंत 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत...

  • Share this:

विवेक कुलकर्णी,(प्रतिनिधी)

मुंबई,5 नोव्हेंबर: शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू आक्रमकपणे लावून धरली असताना मात्र, भाजप स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेशी चर्चेच्या प्रतीक्षेत असलेल्या भाजपला सत्ता स्थापनेची घाई नाही. चर्चेची दारं शिवसेनेकडून बंद असल्याने भाजप प्रतिसादासाठी शेवटच्या क्षणापर्यंत 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहे.

दुसरीकडे, राज्यात राष्ट्रपती लागवट लागू होण्याच्या दिशेने सर्व पक्षीयांची वाटचाल सुरू आहे. येत्या 8 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ संपून नवी विधानसभा अस्तित्वात येईल. सत्तास्थापनेबाबत भाजप-शिवसेनेत तोडगा निघाला नाही तर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास भाजप श्रेष्ठी निवांत असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

- घटनेच्या 356 व्या कलमानुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून राष्ट्रपती तिथला कारभार थेट राज्यपाल यांच्या माध्यमातून पाहू शकतात.

- कोणत्या करण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते? जेव्हा विधिमंडळ राज्‍यपाल यांनी दिलेल्या विहित मुदतीत मुख्यमंत्री निवडू शकत नाही.

- जेव्हा एखादा मुख्यमंत्री विधानसभेच्या पटलावर आपलं बहुमत सिद्ध करू शकत नाही आणि इतर कोणताही पक्ष देखील बहुमताचा आकडा गाठू शकत नाही.

- एखादं सरकार जेव्हा घटनात्मक तरतुदीनुसार चालत नसेल, असा राज्यपालांचा अहवाल राष्ट्रपतींना प्राप्त झाल्यास.

- काही मोठ्या आपात्कालीन परिस्थितीमुळे निवडणुका घेणे शक्य नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू करायची ठरवल्यास पुढील प्रक्रिया काय असेल.

- संसदेच्या दोन्ही सभागृहांची संमती घेऊन सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येते.

- परिस्थितीचा आढावा घेऊन दर सहा महिन्यांनी ही मुदत वाढवता येते.

- 3 वर्षांपेक्षा जास्त काळ राष्ट्रपती राजवट चालू ठेवता येत नाही.

VIDEO : चंद्रकांत पाटील आले समोर, सुप्रिया सुळेंनी असं केलं स्वागत!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2019 11:51 AM IST

ताज्या बातम्या