भाजपने आम्हाला वाऱ्यावर सोडलं, भाजप खासदार वणगा कुटुंबियांचा आरोप

भाजपने आम्हाला वाऱ्यावर सोडलं, भाजप खासदार वणगा कुटुंबियांचा आरोप

आमच्या भागात भाजपला फक्तं दोन मतं पडायची. त्या परिस्थितीत आमच्या वडिलांनी परीश्रम घेऊन पक्ष वाढवला.

  • Share this:

मुंबई, 03 मे : भाजपने आम्हाला वाऱ्यावर सोडलं,  भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आमच्या कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी जराही वेळ नाही अशी टीका करत भाजपचे पालघर लोकसभा मतदारसंघातील दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचं कुटुंब आज 'मातोश्री'वर जाणार आहे.

भाजपचे पालघरचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे सर्व कुटुंबीय आज 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्याआधी या कुटुंबाने पत्रकार परिषद घेतली.

आमच्या भागात भाजपला फक्तं दोन मतं पडायची. त्या परिस्थितीत आमच्या वडिलांनी परीश्रम घेऊन पक्ष वाढवला. ते लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. आमच्या वडिलांच्या निधनानंतर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेटण्याची वेळ मागितली पण आम्हाला मुख्यमंत्री काही भेटले नाहीत. आता आम्ही भाजप पक्ष सोडत आहोत असं वणगा कुटुंबाने जाहीर केलं.

तसंच भाजपने आम्हाला वाऱ्यावर सोडलं.  भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आमच्या कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी जराही वेळ नाही अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

आमच्यावर कोणत्याही राजकीय पक्षाचा दबाव नाही.

पालघर लोकसभा पोट निवडणुकीत आमच्या कुटुंबातील सदस्यांना तिकीट मिळावं अशी आमची अपेक्षा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

First published: May 3, 2018, 7:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading