मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

भाजप खासदार सुजय विखे पाटील आणि पार्थ पवार यांचा एकत्र विमान प्रवास, विमानातला फोटो शेअर करत सुजय यांनी केलं 'हे' Tweet

भाजप खासदार सुजय विखे पाटील आणि पार्थ पवार यांचा एकत्र विमान प्रवास, विमानातला फोटो शेअर करत सुजय यांनी केलं 'हे' Tweet

सुजय विखे अन् पार्थ पवारांचा एकत्र विमान प्रवास, विमान प्रवासानंतर सुजय म्हणाले...

सुजय विखे अन् पार्थ पवारांचा एकत्र विमान प्रवास, विमान प्रवासानंतर सुजय म्हणाले...

Sujay Vikhe Patil and Parth Pawar travel in same plane: भारतीय जनता पक्षाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी पार्थ पवार यांच्यासोबत विमान प्रवासातील फोटो शेअर केला आहे.

  • Published by:  Sunil Desale
मुंबई, 17 ऑक्टोबर : भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकमेकांवर सातत्याने टीका करत आहेत. यासोबतच ईडी (ED), आयकर विभागाच्या (Income Tax) कारवाईवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या सर्व प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापलेलं असताना आता भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (BJP MP Sujay Vikhe Patil) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) याचे एकत्र विमान प्रवासाचे फोटोज समोर आले आहेत. अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील आणि पार्थ पवार यांनी एकाच विमानातून प्रवास केला. दोघांनीही जवळपास 40 मिनिटे एकत्र प्रवास केला. या प्रवासादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली. औरंगाबाद ते मुंबई या प्रवासानंतर खासदार सुजय विखे पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर दोघांचे विमानातला आणि एअरपोर्टवरचे फोटोज पोस्ट केले आहेत. हे फोटोज शेअर करत असताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, सर्व सीमांच्या पलिकडची मैत्री (Friendship Beyond Boundaries..!). आपल्या फेसबूक आणि ट्विटर अकाऊंटवर सुजय विखे पाटील यांनी हे फोटोज शेअर केले आहेत. वाचा : "ED ने महाराष्ट्रात यावं, पण एका अटीवर..." खासदार उदयनराजेंनी घातली 'ही' अट राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच असतात. मात्र, असे असले तरी दोन वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांची मैत्री हा एक वेगळा भाग असतो. राजकीय नेत्यांच्या मैत्रीची महाराष्ट्रात अनेक उदाहरणे आहेत. त्याचाच एक भाग सुजय विखे पाटील आणि पार्थ पवार यांच्याबाबतही आहे. सुजय विखे पाटील यांनी पार्थ पवारांसोबतचे फोटो सोशल मीडियात शेअर केल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पुन्हा येणे जमेना म्हणून आयकर विभागाच्या धाडी, शरद पवारांची सडकून टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणी आणि मुलगा पार्थ पवार यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केली होती. पण, या प्रकरणी खुलासा करण्यासाठी भाजपचे नेते पुढे येत होते. माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष बोलत होते. मुळात ते पुन्हा येईन म्हणाले होते, पण ते जमेना म्हणून सरकार अस्थिर करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे', अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 'अजित पवार यांच्या बहिणीच्या घरी तब्बल 5 दिवस छापे मारले. मध्यमवर्गीय घरात इतके दिवस छापे टाकायला लावले. त्यांना पुढचा आदेश येईपर्यंत दबाव टाकून 5-5 दिवस छापे टाकायला लावले गेले, हे बरोबर नाही. दोन दिवस पाहुणे ठिक असतात पण आठ दिवस पाहुणे राहायला लागले तर वैताग येतो. अधिकाऱ्यांना वरून फोन यायचा. त्यानंतर ते मुक्काम वाढवून होते, असा धक्कादायक खुलासा पवार यांनी केला.
First published:

Tags: BJP, NCP

पुढील बातम्या