देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू खासदार 'सिल्व्हर ओक'वर पवारांच्या भेटीला

देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू खासदार 'सिल्व्हर ओक'वर पवारांच्या भेटीला

राष्ट्रवादीत मिशन 'डॅमेज कंट्रोल'साठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत...

  • Share this:

मुंबई,24 नोव्हेंबर:राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या मदतीने भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, हे सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीने केला आहे. त्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसतर्फे संयुक्तपणे दाखल केलेल्या या याचिकेवर रविवारी दुपारी 11.30 वाजता सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे सकाळीच 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. खासदार संजय काकडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

मिशन 'डॅमेज कंट्रोल'साठी प्रयत्न सुरु

दरम्यान, अजित पवार फुटल्याने राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत मिशन 'डॅमेज कंट्रोल'साठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रकाश गजभिये, बबन शिंदे देखील 'सिल्व्हर ओक'वर पोहोचले आहेत.

दुसरीकडे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्याआधी राज्यपालांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दोघांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

आता या नेत्याकडे सर्व अधिकार..

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर त्यांच्यावर कारवाई केलीय. अजित पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी झाली. आता विधिमंडळ नेतेपदाचे अधिकार जयंत पाटील यांना देण्यात आलेत. अजित पवारांचे व्हिप काढण्यासारखे सगळे अधिकार काढून घेतले आहेत.

राजभवनात सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अजित पवारांनी बंड करून भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही सरकार बनवू, असं सांगितलं. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार येईल, असे ते म्हणाले.

आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना राज्याबाहेर हलवण्यात येणार आहे, अशी माहिती आहे. शपथविधी झाला असला तरी भाजप सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यावेळी विधानसभेत नेमके काय घडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकूणच काय भूमिका घेतात,हे पाहणे महत्त्वाचे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2019 09:54 AM IST

ताज्या बातम्या