Home /News /mumbai /

भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुनेला कुटुंबीयांची बेदम मारहाण? राष्ट्रवादीकडे केली मदतीची मागणी

भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुनेला कुटुंबीयांची बेदम मारहाण? राष्ट्रवादीकडे केली मदतीची मागणी

भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने गंभीर आरोप केला आहे.

    मुंबई, 8 सप्टेंबर : भारतीय जनता पक्षाचे वर्ध्याचे खासदार रामदास तडस (BJP MP Ramdas Tadas) यांच्या सुनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत त्यांच्या सुनेने अत्यंत गंभीर आरोप (Allegations on family members) केला आहे. कुटुंबीयांकडून आपल्याला मारहाण होत असल्याचं त्या व्हिडीओत सांगताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (NCP Rupali Chakankar) यांनी त्यांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत खासदार रामदास तडस यांच्या सुनेने आपल्या कुटुंबीयांवर मारहाणीचा आरोप केला आहे. त्या सांगत आहेत की, मी पूजा... रुपालीताई चाकणकर यांच्याकडे मदत मागतेय. माझ्या जीवाला धोका आहे इथे. मॅडम मला प्लीज येथून घेऊन चाल. मी विनंती करते. दरड कोसळल्याने घाट बंद; उपचारासाठी पत्नीला खांद्यावर घेऊन पतीची पायपीट, मात्र वाटेतच सोडले महिलेने प्राण, नंदुरबारमधील घटना हा व्हिडीओ शेअर करताना रुपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, वर्धा भाजप खासदार रामदास तडस यांच्या सून यांना गेली अनेक दिवस हे तडस कुटूंब मारहाण करून अत्याचार करीत आहेत. पूजाचा आत्ताचा हा व्हिडीओ माझ्यापर्यंत आला, तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलीस संरक्षणासाठी तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलीस संरक्षणासाठी पोहचले आहेत. रुपाली चाकणकर यांनी पूजा यांचा अत्यंत गंभीर आरोप करणारा हा व्हिडीओ शेअर केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अद्याप खासदार रामदास तडस यांच्या कुटुंबीयांकडून प्रतिक्रिया आलेली नाहीये.
    First published:

    Tags: BJP, Crime, NCP

    पुढील बातम्या