तर या ट्वीटवर भाजपच्या नेत्या पंकजा महाजन यांनी संजय राऊत यांना ट्वीटवरच प्रत्युत्तर दिले आहे.'स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका' अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले. त्यानंतर काही वेळांनी संजय राऊत यांनी ट्वीट डिलीट केले. संजय राऊतांचे फडणवीसांना उत्तर दरम्यान, त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. 'मुंबईत पहिला नगरसेवक हा भाजपचा होता, शिवसेनेचा नाही. विधानसभेची पहिली निवडणूक शिवसेनेने लढविली, ती भाजपाच्या चिन्हावर' असा दावाच फडणवीस यांनी केला होता. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांना जशास तसे उत्तर दिले. भाजप पक्षाच्या जन्मतारखेचा दाखला त्यांनी आणला तर उत्तर देणे सोप होईल. भाजप १९८० च्या दशकातील आहे. जनताापक्षाचे जेव्हा पतन झालं तेव्हा स्थापन झालेला पक्ष आहे. शिवसेनेचा जन्म १९६९ सालाचा आहे. शिवसेनेचा पहिला महापौर हेमचंद्र गुप्ते, कधी होते? किती नगरसेवक निवडून आले होते? या संदर्भातील एखादं अभ्यास शिबीर रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये ठेऊ कोणाला आस्वाद घ्यायचा असेल तर येउ द्यात, असं म्हणत राऊतांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले. 'पाहिले आमदार त्याच काळात निवडून आले होते, वामनराव महाडिक, गिरगावात नवलकर, माजगावातून भुजबळ आमचे निवडून आले होते. भाजपच्या जन्माच्या आधी आमचे वाघ निवडून आले होते. फडणवीसांचा तेव्हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणाशी कोणताही संबंध नव्हता. मुळाच फडणवीसांच्या जन्माच्या आधीच्या या गोष्टी आहेत, असं म्हणत राऊतांनी सणसणीत टोला लगावला. ' औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यावर बोलताय, मग आपणही 5 वर्ष मुख्यमंत्री होता. हिंदुत्ववादी म्हणून होतात ना? नाव बदलायला केंद्राने मंजुरी द्यावी लागते. 5 वर्षात आपण का दिलं नाही? 'योगिनीं प्रयागराज करून घेतल तुम्ही तेव्हा का नाही केलं. बाळासाहेबांनी संभाजी नगर केलेलं केव्हाच आहे, तुम्ही काय केलं? असा थेट सवाल राऊतांनी फडणवीसांना विचारला.स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका. https://t.co/dK8l81ZLub
— Poonam Mahajan (@poonam_mahajan) January 24, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.