Home /News /mumbai /

खासदार नारायण राणे दिल्लीला रवाना, मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार?

खासदार नारायण राणे दिल्लीला रवाना, मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार?

मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू असताना नारायण राणेंची दिल्लीवारी राजकीय चर्चेचा विषय बनली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात राणेंना स्थान मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

    मुंबई, 14 जून : भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या (PM Narendra Modi's Cabinet Expansion) हालचाली सुरू असताना नारायण राणेंची दिल्लीवारी राजकीय चर्चेचा विषय बनली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडी घडत असताना राणे दिल्लीत दाखल होत असल्यानं मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंना स्थान मिळणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी नारायण राणेंसारख्या नेत्याला कशा प्रकारचा सन्मान द्यायचा आणि त्यांचा मान कसा राखायचा हे भाजपला माहीत आहे, भाजप त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही असं म्हटले होतं. त्यामुळं आता नारायण राणेंच्या दिल्लीवारीवरून त्यांना मोठं गिफ्ट मिळेल की, काय अशी चर्चा सुरू झाली आहे. नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोकणात आले होते. त्यावेळी अमित शाह यांनी नारायण राणेंच्या कामाचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. अमित शाह यांचा तो भाषणाचा व्हिडिओ आमदार नितेश राणे यांनी ट्विट केला होता. हे वाचा - साडी नेसून ‘भाभीजीं’चा हरियाणवी गाण्यावर जबरदस्त डान्स, VIDEO सोशल मीडियावर तुफान हिट नारायण राणे हे दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. नारायण राणे हे एका महिन्यापूर्वी दिल्लीला जाऊन आले होते. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी त्यांना ठाम खात्री असल्याचंही सांगितलं जात आहे.  त्यामुळे यावेळी ते स्वत:हून दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला स्थान मिळेल असा ठाम विश्वास राणेंना असल्याचं सांगितलं जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Amit Shah, Narayan rane, Narendra modi

    पुढील बातम्या