भाजप खासदाराची Online Shopping, पार्सलमध्ये मोबाईलऐवजी आले चक्क 'दगड'

भाजप खासदाराची Online Shopping, पार्सलमध्ये मोबाईलऐवजी आले चक्क 'दगड'

ही खरेदी करत असताना त्यांनी पैसे देण्यासाठी 'कॅश ऑन डिलिव्हरी' हा पर्याय निवडला होता.

  • Share this:

मुंबई,30 ऑक्टोबर: सध्या दिवाळी फेस्टिव्हल शॉपिंगची सर्वत्र जोरदार धूम सुरू आहे. दरम्यान, ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणूक झाल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे भाजपच्या एका खासदाराला ऑनलाईन शॉपिंगचा 'वाईट' अनुभव आला आहे. मालदा (उत्तर)चे खासदार खगेन मुरमू यांना ऑनलाईन फसवणुकीचा फटका बसला आहे. खासदार खगेन मुरमू यांना पार्सलमध्ये मोबाईलऐवजी चक्क 'दगड' पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन खरेदीसाठी अग्रेसर असलेल्या 'अमेझॉन' या साईटवरून खासदार खगेन मुरमू यांना चुना लावण्यात आला आहे. दरम्यान,ऑनलाईन शॉपिंगमध्ये दिवसेंदिवस फसवणुकीच्या तक्रारी वाढल्या आहेत.

दिवाळी फेस्टिव्हलच्या ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घेण्यासाठी खासदार खगेन मुरमू यांनी 'अमेझॉन' या साईटवरून 11 हजार 999 रुपयांचा मोबाईल फोन ऑर्डर केला होता. आपल्या एका नातेवाईकाला भेट देण्यासाठी म्हणून त्यांनी हा फोन ऑर्डर केला होता. ही खरेदी करत असताना त्यांनी पैसे देण्यासाठी 'कॅश ऑन डिलिव्हरी' हा पर्याय निवडला होता. रविवारी संध्याकाळी ही ऑर्डर त्यांच्यापर्यंत पोहोचली. यानंतर त्यांनी बॉक्स न उघडताच डिलिव्हरी बॉयच्या हाती पूर्ण रक्कम दिली. दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी बॉक्स उघडला असता तो एका वेगळ्याच कंपनीचा बॉक्स असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बॉक्स उघडून पाहिला असता त्यात मोबाईलऐवजी दगड होते. हा प्रकार पाहून खासदार खगेन मुरमू यांनी धक्का बसला.

अतिशय धक्कादायक प्रकार...

अतिशय धक्कादायक प्रकार असल्याचे खासदार खगेन मुरमू यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. यापूर्वी आपण कधीही काहीच ऑनलाईन न मागवल्याचे त्यांनी सांगितली. या प्रकाराची माहिती आपण ग्राहक तक्रार निवारण आणि याच्याशी संबंधित खातं हाताळणाऱ्या केंद्रीय मंत्री महोदयांकडे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

CCTV VIDEO: जेवण चांगल न दिल्याच्या रागातून वेटरला बेदम मारहाण

Published by: Sandip Parolekar
First published: October 30, 2019, 3:44 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading