Home /News /mumbai /

'अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर करा', भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

'अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर करा', भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

'अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर करा', भाजप आमदाराचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

'अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर करा', भाजप आमदाराचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

अहमदनगर' जिल्याचे नाव बदलून 'अहिल्यादेवी नगर' करण्यात यावे अशी मागणी करणारं पत्र भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे.

तुषार रूपनवर, प्रतिनिधी सांगली, 2 जून : औरंगाबाद जिल्ह्याचं नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा सुरू असतानाच आता अहमदनगर जिल्ह्याच्या (Ahmednagar district) नामांतराचा विषय समोर आला आहे. अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून 'अहिल्यादेवी नगर' (Ahilyadevi Nagar) करा अशी मागणी करण्यात येत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही मागणी केली आहे. इतकेच नाही तर गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र सुद्धा लिहिलं आहे. "हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे 'अहमदनगर' नाव बदलून 'अहिल्यादेवी नगर' करण्यात यावे.नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल. जय अहिल्या,जय मल्हार..." असं ट्विट सुद्धा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपणास अभिप्रित असेल की शेकडो हिंदूचे जीव गेलेल्या मुंबई बॅाम्बब्लास्टचा सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या बहिणीसोबतचे आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते मा. शरदचंद्र पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये मुघलशाही पद्धतीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखलं. यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॅान्च करण्याचा इव्हेंट वाटतो? वाचा : जोडीदार शोधण्यापासून ते लग्नापर्यंत सर्व मोफत, शिर्डी साईबाबा विवाह संस्थानकडून Shirdivivah.com वेबसाईट लॉन्च जेव्हा हिंदूस्थान मुसलमानी राजवटीत हिंदूसंस्कृती, मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या हिंदुसंस्कृतीत प्राण फुकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. म्हणून तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे की, हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे 'अहमदनगर' नाव बदलून 'अहिल्यानगर' करण्यात यावे त्यासाठी मी आपणास पत्र लिहीले असल्याचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. तसेच नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल आणि होळकरशाहीचा सम्मान कराल ही अपेक्षा, अन्यथा हा बहुजन जागा झालाय आणि संघटीत झालाय, हे ध्यानात ठेवा. असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ahmednagar, Gopichand padalkar, Uddhav thackeray

पुढील बातम्या