Home /News /mumbai /

"आज काळीज भाटलं, त्यानं आकाश गाठलं" मुलगा अविष्कारसाठी आमदार विजय रहांगडाले यांची भावनिक पोस्ट

"आज काळीज भाटलं, त्यानं आकाश गाठलं" मुलगा अविष्कारसाठी आमदार विजय रहांगडाले यांची भावनिक पोस्ट

MLA Vijay Rahangdale emotional post for son Avishkar: अपघातात मृत्यू झालेल्या अविष्कारसाठी आमदार विजय रहांगडाले यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. फेसबूकवर त्यांनी ही पोस्ट लिहून मुलाला श्रद्धांजली वाहिली आहे.

    वर्धा, 27 जानेवारी : दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गोरेगावचे आमदार विजय रहांगडाले (MLA Vijay Rahangdale) यांच्या मुलाचा मृत्यू झाला. आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार रहंगडाले (Avishkar Rahangdale) याच्यासह त्याच्या सहा मित्रांचाही या अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी रात्रीच्या सुमारास वर्धा जिल्ह्यात (accident in Wardha) हा अपघात झाला होता. नदी पुलावरुन कार थेट खाली कोसळून झालेल्या अपघातात सातही मुलांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर आमदार विजय रहांगडाले यांनी आपल्या मुलासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट लिहून त्यांनी आपल्या मुलाला श्रद्धांजली वाहिली आहे. (MLA Vijay Rahangdale emotional facebook post for son Avishkar) काय म्हटलं आहे फेसबूक पोस्टमध्ये? आज काळीज फाटलं, त्यानं आकाश गाठलं; अविष्कार आमचा हिरा, होता आनंदाचा झरा; डॉक्टर नव्हते खमारी गावात, होती खंत आणि हुरहूर आमच्या मनात; बापाचे स्वप्न पूर्ण करण्या, गेला होता अविष्कार डॉक्टर बनण्या; लागली कुणाची नजर, आज दगडालाही फुटली पाझर; गेला तरुण वयात सोडून, केलेले सारे वादे तोडून; तुझी आई आजही वाट पाही, तिला तुझ्या डॉक्टर बनण्याची घाई; कसे समझवू तिला, तू परत येणार नाहीस मुला; कुठे हरवलास पाखरा, परत ये रे आमच्या लेकरा; गेलास अविष्कार आम्हाला सोडून, तुझ्यासाठी रंगविलेले सारे स्वप्न मोडून आज आहे मातम सगळीकडे, आई बाबा संगे सारा गाव ही रडे. कसा झाला नेमका अपघात? वर्ध्यातील सेलसुरा इथं 24 जानेवारी रोजी महिंद्रा एसयुव्ही 500 चा भीषण अपघात झाला होता. या अपघातात आमदार विजयभाऊ रहांगडाले (Vijay Rahangdale's Son) तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्र यांचा एकुलता एक मुलगा अविष्कार रहांगडाले (Avishkar Rahangdale Accident) यांच्यासह 7 मित्रांचा मृत्यू झाला होता. वाचा : पवनची बर्थ डे पार्टी केली अन् काही मिनिटांत मृत्यूने गाठले, वर्ध्याच्या 7 विद्यार्थ्यांचा अपघाताआधीचा VIDEO आला समोर इसापूर जवळील एका हॉटेलमध्ये ही सातही भावी डॉक्टर जेवणासाठी आले होते. त्यानंतर इथून निघाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्यांना मृत्यूने गाठले. अपघातापूर्वीच हे सातही मित्र एका हॉटेलवर गेले होते. अपघातात मृत पावलेल्या पवन शक्ती याचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी हे जेवणासाठी गेले होते. नागपूर तुळजापूर महामार्गवरील देवळी समोरील इसापूर जवळील एका हॉटेलमध्ये हे पोहोचले होते. तेथील सीसीटीव्हीमध्ये कार स्पष्टपणे दिसून आली आहे. हॉटेलमध्ये पवनच्या वाढदिवसाचा केक कापला आणि जेवण केलं. त्यानंतर सर्व जण घरी परत येत होते. पण काही अंतरावर जात नाही, तेच या कारचा भीषण अपघात झाला.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Accident, BJP, Facebook, Wardha

    पुढील बातम्या