मुंबई, 4 डिसेंबर : सातारा जिल्हा बँकेची नुकतीच निवडणूक पार (Satara district central co operative bank eletion) पडली. त्यानंतर आता सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाची निवड होणार आहे आणि त्यासाठी राजकीय नेत्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्याच दरम्यान सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendra Raje Bhosale) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. शरद पवारांची शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत चर्चा केली आहे. इतकेच नाहीतर आपल्याला अध्यक्षपद मिळावे अशी इच्छाही शिवेंद्रराजेंनी शरद पवारांकडे व्यक्त केली असल्याचं बोललं जात आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवारांची भेट
गुरुवारी शिवेंद्रराजे भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली होती. बँकेच्या अध्यक्षपदासाठी आपण इच्छूक असल्याचं शिवेंद्रराजेंनी त्यावेळी अजित पवारांना म्हटल्याचंही वृत्त समोर आलं आहे.
अध्यक्षपदासाठी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित पवार आणि शरद पवारांकडे इच्छा व्यक्त केली आहे. तर या निवडणुकीत शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळेच आपला पराभव झाला असल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला होता. त्यामुळे आता शरद पवार काय निर्णय घेतात हे पहावं लागेल.
वाचा : हिवाळी अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार
पराभवानंतर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (Satara District central co operative bank election) शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. या पराभवानंतर शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भाष्य केलं. तसेच आपल्या पराभवामागचं कारणही त्यांनी सांगितलं. माझा गाफीलपणा नडला ही वस्तुस्थिती आहे अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली.
वाचा : मुंबई पालिकेत राडा, भाजप-सेनेचे नगरसेवक भिडले
मला पाडण्यात शिवेंद्रराजेंचा हात
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मला पाडण्यात संपुर्णपणे शिवेंद्रराजे भोसले यांचा हात असुन त्यांना राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी मदत केल्याचा मोठा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला. साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत शशिकांत शिंदे यांनी हा आरोप केला होता. राष्ट्रवादीतुनच विरोधकांना मदत होते याची खंत बोलुन दाखवत साताऱ्यातील मुख्य नेतेच विरोधकांना सोबत घेवून खलबत करतात त्यामुळे राष्ट्रवादीच्या भवितव्याला मोठा धोका निर्माण झाला असल्याचं शशिकांत शिंदे यांनी सांगितल आहे, यावेळी त्यांचा रोख हा रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.