Home /News /mumbai /

'महाराष्ट्रात खरंच दंगल घडविण्याचा कट?', राम कदमांचा 'त्या' घटनेवरुन काँग्रेसवर घणाघात

'महाराष्ट्रात खरंच दंगल घडविण्याचा कट?', राम कदमांचा 'त्या' घटनेवरुन काँग्रेसवर घणाघात

धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धुळे जिल्ह्यातील सोनगीर पोलिसांनी बुधवारी सकाळी एक स्कॉर्पिओ गाडी पकडली. या गाडीतल तब्बल 89 तलवारी आणि एक खंजीर मिळालं आहे. याच प्रकरणावरुन आता राजकारण पेटताना दिसत आहे.

    मुंबई, 28 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे (Mosque loudspeaker) खाली उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. या अल्टिमेटमनंतर राज्य सरकार (Maharashtra Government) आणि पोलीस यंत्रणा (Maharashtra Police) सतर्क झाले आहेत. राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी गोपनीय अहवालाचा उल्लेख करत महाराष्ट्रात 3 मे नंतर विस्फोटक परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याचा दावा केला होता. या सर्व घडामोडी पाहता सुरक्षेच्या दृष्टीने सर्व गोष्टींची काळजी घेतली जात आहे. या दरम्यान, धुळे (Dhule) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धुळे जिल्ह्यातील सोनगीर पोलिसांनी (Songir Police) बुधवारी सकाळी एक स्कॉर्पिओ गाडी पकडली. या गाडीतल तब्बल 89 तलवारी (sword) आणि एक खंजीर मिळालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात खरंच दंगल (riot) घडविण्याचा कट आखला जात आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे संबंधित प्रकरणावरुन भाजप आमदार राम कदम (BJP Ram Kadam) यांनी थेट काँग्रेसवर (Congress) गंभीर आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या चितोडगड येथून महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यात स्कॉर्पिओ गाडीतून शस्त्रास्त्रे नेले जात होते. ही गाडी आर्गा महामार्गाने जात असताना गस्तीवर असलेल्या सोनगीर पोलिसांना काही संशयास्पद हालचाली वाटल्या. त्यांनी स्कॉर्पिओ गाडीचा पाठलाग करत त्या गाडीला अडवलं. पोलिसांनी त्या गाडीची झडती घेतली असता गाडीत शस्त्रास्त्रे सापडले. याच प्रकरणावरुन भाजप आमदार राम कदम यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. (भाजपचं ठरलं! महाराष्ट्र दिनी होणार 'बुस्टर डोस' सभा; शिवसेनेसह मविआला देणार कडकडीत डोस) "महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे कारस्थान? जेथे कॉंग्रेसचे सरकार आहे त्या राजस्थानमधून जालना जाणार्‍या 90 तलवारी ताब्यात. याआधीच पुणे येथे तलवारी औरंगाबाद येथे जात असताना ताब्यात घेण्यात आल्या आहेत. कॉंग्रेस या षड्यंत्रात सामील आहे का? ठाकरे सरकार याच्या मुळाशी", असा आरोप राम कदम यांनी केला आहे. दरम्यान, सोनगीर पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडीसह 7 लाख 13 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच मोहम्मद शरीफ, मोहम्मद शफिक, शेख इलियास शेख लतिफ, सय्यद रहिम आणि कपिल विष्णू दाभाडे या चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: BJP, Dhule, Maharashtra News, Ram kadam

    पुढील बातम्या