भाजप नेत्यांपाठोपाठ आता आमदारही राज्यपालांच्या भेटीला, केली 'ही' मागणी

भाजप नेत्यांपाठोपाठ आता आमदारही राज्यपालांच्या भेटीला, केली 'ही' मागणी

दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी मंगळवारी रात्री मुंबई राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

  • Share this:

सुमित सोनवणे, प्रतिनिधी

दाैंड, 27 मे : राज्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटी घेण्याचे सत्र सुरूच आहे. दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी राज्यपाल  यांची भेट घेऊन दौंड तालुक्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजना व विविध मागण्या संदर्भात चर्चा केली.

दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी मंगळवारी रात्री मुंबई राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी, कोरोनाचा सामना करत असताना संचारबंदीमुळे गोर-गरीब जनता, कामगार, कष्टकरी,मजूर, व हातावर पोट असलेल्या छोट्या मोठया विक्रेत्यांचा समस्यांची दखल घेऊन शासनाने लवकरात लवकर विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी कुल यांनी केली.

हेही वाचा -लॉकडाउनबद्दल अजित पवारांनी दिले मोठे संकेत; मुख्यमंत्र्यांशीही बोलणार!

तसंच, 'प्रशासन आणि शासन यामध्ये समन्वय साधत योग्य निर्णय घेण्यात यावे. पोलीस व सार्वजनिक आरोग्य विभागावरील ताण कमी करावा, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांकडे विशेष लक्ष द्यावे', अशी विनंती आमदार राहुल कुल यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली.

कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यात स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या विविध उपाययोजना संदर्भांत आमदार राहुल कुल यांनी राज्यपालांना माहिती दिली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.

हेही वाचा -हॉस्पिटलमध्ये आरोपींनी केला ड्रामा, पोलिसांनी दोघांना पकडलं पण...

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर सर्वच नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. अलीकडे भाजपमध्ये दाखल झालेले नारायण राणे यांनीही राज्यपालांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते.  पण, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपची अशी कोणतीही मागणी नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या वादावर आता पडदा पडला आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 27, 2020, 11:11 AM IST
Tags: BJP

ताज्या बातम्या