Home /News /mumbai /

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना धमकीचा फोन, जीवे मारण्याची धमकी

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना धमकीचा फोन, जीवे मारण्याची धमकी

एका अज्ञात फोन नंबरवरून प्रसाद लाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे

एका अज्ञात फोन नंबरवरून प्रसाद लाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे

एका अज्ञात फोन नंबरवरून प्रसाद लाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे

    मुंबई, 30 जून : महाराष्ट्रामध्ये एकीकडे राजकीय सत्तासंघर्ष पेटला आहे. पण, अशा या वातावरणामध्ये नेत्यांना धमकीचे फोन आणि पत्र येत असल्याचे समोर आले आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड (bjp mla prasad lad) यांना धमकीचा फोन आल्याचे समोर आले आहे. जीवे ठार मारण्याची धमकी लाड यांना देण्यात आली आहे. या प्रकारानंतर लाड यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना धमकीचा फोन आल्याचे समोर आले आहे. एका अज्ञात फोन नंबरवरून प्रसाद लाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून एका अज्ञात फोन नंबरवरून धमकीचे फोन येत आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता माझ्या जीवाला धोका आहे, असं प्रसाद लाड म्हणाले आहे. या प्रकारानंतर प्रसाद लाड यांनी पोलीस गुन्हे सहआयुक्त यांच्याकडे तक्रार केली असून सीडीआर काढण्याची विनंती केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या आणि महापौर किशोरीताई पेडणेकर (Kishori Pednekar) यांना सुद्धा पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अत्यंत अश्लिल भाषेत हे पत्र लिहून धमकी दिली आहे. किशोरी पेडणेकर यांना अश्लिल भाषेत पत्र लिहून जीवे मारण्याची धमकी देणात आली आहे. हे पत्र उरणमधील विजेंद्र म्हात्रे (vijendra mhatre) नावाच्या वकिलाने पाठवले आहे. या वकिलाने याआधीही असंच पत्र पाठवले होते. या पत्रात किशोरी पेडणेकर यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या सांगण्यावरूनच सरकार पाडले जात आहे, असा उल्लेख ही विजेंद्र म्हात्रे याने केला आहे. हे पत्र विजेंद्र म्हात्रे या नावाच्या व्यक्तीने हे पत्र लिहिलं आहे. हे पत्र उरणमधून पाठवलंय. पोस्टल पनवेलच आहे विजेंद्र म्हात्रे याने हे पत्र लिहिलं असून तो अॅडव्होकेट आहे असे लिहिले, अशी माहिती त्यावेळी खुद्द पेडणेकर यांनी दिली होती. या प्रकरणी पेडणेकर यांनी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच वकिलाने पेडणेकर यांना धमकी दिली होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या