Home /News /mumbai /

मोठी बातमी, भाजपचा आमदार 'कृष्णकुंज'वर राज ठाकरेंच्या भेटीला!

मोठी बातमी, भाजपचा आमदार 'कृष्णकुंज'वर राज ठाकरेंच्या भेटीला!

दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून भेटीबद्दल माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

मुंबई, 22 जानेवारी : भाजपचे आमदार प्रसाद लाड (BJP Mla Prasad laad) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांच्या मुंबईतील कृष्णकुंज निवास्थानी जाऊन भेट घेतली आहे. प्रसाद लाड राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचल्यामुळे राज्यातील राजकारणात चर्चवितर्कांना उधाण आले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपल्या तक्रारी घेऊन अनेक जण कृष्णकुंज या निवास्थानी येत असतात.  आज भाजपचे आमदार प्रसाद लाड हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. मात्र, भेटीबद्दल माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. आजी रॉक्स बाकी सगळे शॉक, 89व्या वर्षी चालवली नातवाची हुंदई कार! पाहा हा VIDEO प्रसाद लाडच नाहीतर याआधी सुद्धा भाजपचे आमदार आशिष शेलार, विनोद तावडे यांनी वेळोवेळी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर पोहोचले होते. इश्काचा बाण सुटला, मेट्रोमध्ये राष्ट्रवादी नेत्याचे तृतीयपंथीयासोबत ठुमके, VIDEO विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी  प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स बजावले होते.  त्यामुळे प्रसाद लाड यांची चौकशी होणार अशी शक्यता आहे. 2009 साली प्रसाद लाड यांनी मुंबई महापालिकेमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. लाड हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यातच आता लाड हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना  उधाण आले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या