मुंबई, 04 डिसेंबर : महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करण्याची भाजपमध्ये मालिका सुरूच आहे. आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी तर शिवरायांच्या जन्माबद्दल अजब वक्तव्य केलं होतं. अखेरीस टीका झाल्यानंतर लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंगलप्रभात लोढा, गोपीचंद पडळकर यांच्यापाठोपाठ आता आमदार प्रसाद लाड यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भलतेच विधान केले होते. शिवरायांचा जन्म हा कोकणामध्ये झाला होता, असं वक्तव्य लाड यांनी केलं. लाड यांच्या विधानामुळे वाद पेटला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं जोरदार टीका केल्यामुळे अखेर लाड यांनी सारवासारव केली आहे.
विश्वाचे आराध्य दैवत शिवरायांचा सन्मान आम्ही यापुढेही ठेवणार! कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.
— Prasad Lad (@PrasadLadInd) December 4, 2022
विश्वाचे आराध्य दैवत शिवरायांचा सन्मान आम्ही यापुढेही ठेवणार आहे. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली.
काय म्हणाले होते लाड?
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या.@PrasadLadInd@BJP4Maharashtra pic.twitter.com/gU1P43QLFD
— NCP (@NCPspeaks) December 4, 2022
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात नवीन इतिहास मांडला.
( राज्यपालांचा बोलवता धनी कोण? राज ठाकरेंनी सांगितली हकीकत)
"छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आणि त्यांचे बालपण रायगडावर गेले". असं वक्तव्य लाड यांनी करत पुन्हा एकदा इतिहासाशी छेडछाड केली आहे. विशेष म्हणजे, यावेळी त्यांच्या शेजारीच प्रवीण दरेकर हे बसलेले होते.
यांची लायकी आहे का? संजय राऊत प्रसाद लाड यांच्यावर भडकले
(सुप्रिया सुळेंवर टीका भोवली, 'सत्तारांवर योग्य ती कारवाई करा', राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र)
दरम्यान, 'कोण प्रसाद लाड, ते काय दत्तू मामा पोतदार आहे का, यदुनाथ सरकार आहे का, मुळात भाजपचं डोकं फिरलं आहे. रोज नवे विधानं केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जी भवानी तलवार आहे ना, एक दिवस त्या तलवारीने यांचे मुंडक छाटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती यांना खत्म करेल असं वाटतंय की यांच्या स्वप्नात अफजल खान आणि औरंगजेब येतो, यांच्या कानात काहीतरी मंत्र देतात आणि हे बोलतात यांची लायकी आहे का? असा सवाल करत राऊत यांनी लाड यांना फटकारलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news