मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना पत्र, "वस्तूस्थिती आपल्यापासून लपवली असेल म्हणूनच मी हे वास्तव..."

नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना पत्र, "वस्तूस्थिती आपल्यापासून लपवली असेल म्हणूनच मी हे वास्तव..."

नितेश राणेंचं मंत्री आदित्य ठाकरेंना पत्र, 'पत्रास कारण की....'

नितेश राणेंचं मंत्री आदित्य ठाकरेंना पत्र, 'पत्रास कारण की....'

Nitesh Rane letter to Aditya Thackeray : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 30 नोव्हेंबर : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे सातत्याने शिवसेनेवर निशाणा साधत असतात. पण आता नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना एक पत्र लिहिलं (Nitesh Rane writes letter to Aditya Thackeray) आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगभरात चिंतेचे वातावरण असतानाच महाराष्ट्र सरकारने खबरदारी म्हणून पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरेंनी काल बीएमसी मुख्यालयात एक बैठक घेतली. त्यानंतर आज मुंबईतील फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरणाच्या संदर्भात नितेश राणे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

आघाडी सरकारने फक्त फरफट आणून ठेवली

नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं, "कोरोना काळात अनेकांनी आपले प्रियजन गमावले. या कठीण काळात महाविकास आघाडी सरकारने व मुंबई महानगरपालिकेत असलेल्या सत्ताधारी सेनेने आपल्या नियोजनाचा अभाव आणि अनाठायी निर्बंधातून सामान्य जनतेला मेटाकुटीला आणलं."

"दवाखान्यात लागणाऱ्या आगी, ऑक्सिजन अभावी तडफडून मेलेली जनता, ऑक्सिजन गळती यामुळे आरोग्य सेवेचे पुरते थिंडवडे निघाले. परंतु अशाही प्राप्त परिस्थितीत फ्रंटलाईन वर्कर, कोविड वॉरिअर्सनी आपल्या कुटुंबाचा विचार न करता सामान्य नागरिकांची अहोरात्र सेवा केली. त्यांच्या नशिबी मात्र, आघाडी सरकारने फक्त फरफट आणून ठेवली."

वाचा : पहाटेच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला पश्चाताप, म्हणाले 'ते नसते केले तर बरे झाले असते'

... फक्त घोषणाच झाल्या

आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर नाही म्हणून त्यांना आंदोलन करावी लागली. सरकार साध विम्याचं कवचही कर्मचाऱ्यांना व फ्रंटलाईन वर्कर्सना देऊ शकलं नाही. जे कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या फक्त घोषणाच झाल्या असंही पत्रात म्हटलं आहे.

ही अत्यंत लाजिरवाणी बाब

ज्या फ्रंटलाईन वर्कर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचं भांडवलं करत राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला, त्याच फ्रंटलाईन वर्कर्सच्या दुसऱ्या लसीकरणाचा टप्पा सत्ताधारी सेनेला पूर्ण करता आला नाही. 26 जानेवापीरपासून मुंबईत पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर यांच्या लसीकरणाची मोहिम राबवण्यात आली होती. परंतु या कर्मचाऱ्यांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही, कोरोनाशी दोन हात करणाऱ्या सुमारे 94 हजार आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांचे दोन डोस झालेलले नाहीत, ही अत्यंत खेदजनक व लाजिरवाणी बाब आहे असंही पत्रात म्हटलं आहे.

वाचा : राज्य मंत्रिमंडळाचे चार मोठे निर्णय

आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणाची मोहिम महापालिकेने हाती घेतल्यानंतर 7 लाख 56 हजार 539 जणांचे लसीकरण झाले. यातील फक्त 4 लाख 25 हजार 464 जणांचा केवळ पहिलाच डोस झडाला आहे. तर त्यातील केवळ 3 लाख 31 हजार 75 जणांचेच दोन डोस पूर्ण झाले, म्हणजेच 94 हजार 389 आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सचा फक्त एकच डोस झाला आहे. मुंबई महानगरपालिका आपल्याच कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या डोसविषयी हलगर्जी व उदासीन आहे. हा विरोधाभास पालिका प्रशासनातील गोंधळच दर्शवतो. आपल्या नाकर्तेपणाचं सगळं पाप झाकण्यासाठी सगळं खापरं कोरोनावर फोडायचं आणि फ्रंटलाईन वर्कर्सनी केलेल्या कामाचं श्रेय महापालिकेनं मिरवायचं असं स्वार्थी धोरण सत्ताधारी सेना राबवत आहे. हे अत्यंत निंदनिय आहे.

ही वस्तूस्थिती आपणापासून लपवली असेल म्हणून...

आपल्या पत्रात नितेश राणे यांनी पुढे म्हटलं, कालच आपण महाविकास आघाडी सरकारची धुरा आपल्.या खांद्यावर सांभाळत कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटबाबत मुंबई महापालिकेत आढावा बैठक घेतली. पण मला खात्री आहे की, ही वस्तूस्थिती आपणापासून लपवली गेली असेल. म्हणूनच मी हे वास्तव आपल्या निदर्शनास आणून देई इच्छितो. जेणेकरुन महानगरपालिकेचे फ्रंटलाईन वर्कर तथापी आरोग्य कर्मचारी यांना संशय निर्माण ना होवो की ठाकरे सरकार हे त्यांच्या सोबत संधीसाधूपणाचं राजकारण तर करत नाही ना?

First published:

Tags: Aaditya thackeray, Nitesh rane