मुंबई 16 मे: भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. मुंबई पुण्याहून गावाकडे परतणाऱ्या लोकांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारले जात आहेत. त्या शिक्क्यांमुळे एका मुलीच्या हातावर रिअॅक्शन उमटली आहे. हातावर डाग पडले असून फोडही आले आहेत. त्यावरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे सरकावर तोफ डागली आहे. सरकारचं काम हे लोकांना दुखावणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
गावातून शहरांकडे जाणाऱ्या किंवा शहरांमधून गावाकडे येणाऱ्या लोकांची गावाच्या सीमेवर त्यांची नोंदणी आणि तपासणी केली जाते. त्यानंतर त्यांनी आपल्या घरातच राहावं यासाठी त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्केही मारले जात आहेत. एका विशिष्ट प्रकारच्या शाईने हे शिक्के मारले जात आहेत. शेकडोंच्या संख्येने लोक येत असल्याने एकाच शिक्क्याच्या माध्यमातून सर्वांच्या हातावर ठप्पा मारला जातो.
खारेपाटन सिंधुदूर्ग सीमेवर एका मुलीच्या हातावर शिक्का मारला गेला. ती मुलगी देवगडची राहणारी आहे. दुसऱ्या दिवशी तिचा हात काळा झाला, सुजला आणि त्यावर फोडही आलेत. त्या शिक्क्याची ती रिअॅक्शन असल्याचं बोललं जातंय.
एवढ्या मोठ्या संख्येने हातावर शिक्के मारले जात असल्यामुळे त्याचा परिणाम झाला असावा असाही अंदाज आहे. हे शिक्के मारताना जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली गेली नाही त्यामुळए ही परिस्थिती ओढवली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
This is what is happening with stamps that people r gettin while crossing the kharepatan border Sindhudurg!
This girl from devgad got the stamp yesterday and this morning her hand turned like this!
The Maha Gov is just hurting us in different ways!! Fed Up!! pic.twitter.com/2NorRewzTX
— nitesh rane (@NiteshNRane) May 16, 2020
सरकार लोकांना अशा प्रकारे शिक्के मारून दुखावत आहे. त्यामुळे सरकारच्या कामाने निराशा निर्माण झाल्याची टीकाही नितेश राणे यांनी केली आहे.
हे वाचा -
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युदरात घट
बिबट्याच्या जबड्यातून तरुणाच्या सुटकेचा थरार, तुम्ही कधीच न पाहिलेला VIDEO