Home /News /mumbai /

...मग उद्धवजी पण गारद का? पवारांच्या मुलाखतीवरून नितेश राणेंची राऊतांवर बोचरी टीका

...मग उद्धवजी पण गारद का? पवारांच्या मुलाखतीवरून नितेश राणेंची राऊतांवर बोचरी टीका

या मुलाखतीत राऊतांनी शरद पवारांना अनेक गुगली प्रश्न विचारले. मात्र, त्या सर्व प्रश्नांवर पवारांनी षटकार ठोकत खास आपल्या शैलीत उत्तरं दिल्याने राजकीय वर्तुळात त्याकडे लक्ष लागलं आहे.

  मुंबई 8 जुलै: शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या मुलाखतीची (Sharad Pawr Interview) चर्चा सध्या राजकीय क्षेत्रात चांगलीच सुरू आहे. ही मुलाखत सामना स्टाईल असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्याचा प्रोमही त्यांनी ट्विट केलाय. त्यावर टॅगलाईन देतांना त्यांनी ‘एक शरद, सगळे गारद’ असं म्हटलं होतं. त्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. एक शरद, सगळे गारद तर मग  उद्धवजीही (CM Uddhav Thackeray) गारद झालेत का? असा सवाल त्यांनी संजय राऊतांना केला आहे. तुम्ही आपल्याच मालकाला असं म्हणता असं म्हणत वाह! वाह! क्या बात है अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे. या मुलाखतीच्या पहिल्या भागात कोरोनाचा सुरू असलेला प्रादुर्भाव ते राम मंदिर पर्यंतच्या प्रश्नांवर शरद पवार यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. येत्या शनिवारी या मुलाखतीचा पहिला भाग शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्र आणि डिजिटल माध्यमांवर प्रसिद्ध होणार आहे. 11, 12 आणि 13 जुलै रोजी या मुलाखतीचे भाग प्रसिद्ध होणार आहे. हे वाचा -  ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का? सेनेचा फडणवीसांना सणसणीत टोला संजय राऊत यांनी आत्तापर्यंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखती चांगल्याच गाजल्या आहेत. सामनामधून या मुलाखती आल्यानंतर अनेकदा देशभर वादळं निर्माण झाली होती. राऊतांच्या बेधडक प्रश्नांना बाळासाहेबांनी दिलेली बेधडक उत्तरं चांगलीच गाजली होती. आता संजय राऊतांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत राऊतांनी शरद पवारांना अनेक गुगली प्रश्न विचारले. मात्र, त्या सर्व प्रश्नांवर पवारांनी षटकार ठोकत खास आपल्या शैलीत उत्तरं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चीन पासून ते महाराष्ट्रातल्या घटनांपर्यंत अनेक विषयांवर पवारांना प्रश्न विचारले ही प्रश्नोत्तरे सामना स्टाईल झाली.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Nitesh rane, Sharad pawar, Uddhav thackeray

  पुढील बातम्या