अख्खा महाराष्ट्र रडतोय अन् भाजपचे 'हे' आमदार नाचगाण्यात दंग!

अख्खा महाराष्ट्र रडतोय अन् भाजपचे 'हे' आमदार नाचगाण्यात दंग!

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात ओढवलेल्या पूरस्थितीने संपूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या सावटाखाली असताना भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी भाईंदरमध्ये आपल्या समर्थकांसोबत एका गाण्यावर ठेका धरला.

  • Share this:

विजय देसाई, (प्रतिनिधी)

मीरा भाईंदर, 13 ऑगस्ट - कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात ओढवलेल्या पूरस्थितीने संपूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या सावटाखाली असताना भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी भाईंदरमध्ये आपल्या समर्थकांसोबत एका गाण्यावर ठेका धरला. उत्तर भारतीय मोर्चा आयोजित 'कजरी महोत्सव' या कार्यक्रमात सध्या आमदार नरेंद्र मेहता हे दंग आहेत.

महापौर डिंपल मेहता तसेच प्रसिद्ध हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांनी कजरी महोत्सवाला हजेरी लावली होती. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात पूरस्थिती ओढवली आहे. राज्यभरातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू आहे. धान्य, पाणी, जीवानश्याक वस्तूसाठी मदतीची हाक दिली जात असताना कजरी महोत्सवात उत्तर भारतीय मोर्चाचे पदाधिकारी लाखो रुपयांची उधळपट्टीत करण्यात व्यस्त आहेत.

(हेही वाचा.. मोठ्या मनाची तन्वीर.. आठ वर्षाय चिमुकलीने पूरग्रस्तांना दिले वाढदिवसाचे पैसे)

भाजप आमदाराच्या या कृतीचा काँग्रेस आणि मनसेने निषेध केला आहे. मीरा भाईंदरच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेलं कृत्य हे काही नवीन नाही. शहीद मेजर कौस्तुभ राणे याचं पार्थिव आले होते तेव्हा सुद्धा हेच आमदार महाशय वाढदिवसाच्या पार्टीत रंगले होते. अशी टीका काँग्रेस प्रवक्ता (मीरा भाईंदर) अंकुश मालुसरे आणि मनसे शहर अध्यक्ष (मीरा भाईंदर) प्रसाद सुर्वे यांनी केली आहे. आमदार नरेंद्र मेहता आणि उत्तर भारतीय मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांवर पक्ष आता काय कारवाई करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

VIDEO : बाळ जन्मलं आणि पुराने वेढा घातला, कशी केली सुटका? ऐका आई-बाबाची कहाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 13, 2019 04:10 PM IST

ताज्या बातम्या