मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BJP आमदारांनी रामाची आणि विठोबाची जमीन लाटली, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

BJP आमदारांनी रामाची आणि विठोबाची जमीन लाटली, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

Nawab Malik Press Conference: नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आज भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

Nawab Malik Press Conference: नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आज भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

Nawab Malik Press Conference: नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आज भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

  • Published by:  Sunil Desale

विनोद राठोड, प्रतिनिधी

मुंबई, 21 डिसेंबर : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. भाजपच्या आमदारांनी रामाची जागा लाटल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. जमीन घोटाळा प्रकरणी वक्फ बोर्डाकडून एकूण 11 तक्रारी आम्ही दाखल केल्या आहेत. नांदेड, औरंगाबाद, परभणी, पुणे, जालना, बदलापूर, बीड आणि औरंगाबाद या ठिकाणी या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यासोबतच एका मशिदीच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nawab Malik serious allegation on BJP MLA)

आष्टीमध्ये तीन दर्गा आणि मशिदीच्या जागेवर बेकायदेशीरपणे सर्व्हिस इनाम ऐवजी मदत इनाम जाहीर करुन खाजगी नावे चढवली. यानंतर हे प्लॉट्स विक्री करण्याचं काम सुरू केलं. याची माहती आम्हाला मिळताच आम्ही तक्रार दाखल केल्या. हिंदू देवस्थानच्या 7 जागा आणि मुस्लिम देवस्थानच्या 3 अशा एकूण 10 ठिकाणी देवस्थानच्या जागेवर भ्रष्टाचार झाला आहे.

नवाब मलिक म्हणाले, मंदिराच्या जागेवर सुद्धा भ्रष्टाचार झाला आहे. विठोबा देवस्थान 31 एकर 42 गुंठे, पांढरी तालुका आष्टी खंडोबा देवस्थान 35 एकर, श्रीराम देवस्थान तालुका आष्टी 29 एकर, चिखली हिंगणी श्रीराम देवस्थान 15 एकर, चिंचपूर राम देवस्थान 65 एकर, बेळगाव खंडोबा देवस्थान 60 एकर आणि खडकर विठोबा देवस्थान 50 एकर अशी एकूण 300 एकर जमीन हिंदू देवस्थानाची खालसा करण्याचे काम अधिकाऱ्यांच्या संगनमताने करण्याचं काम झालं आहे.

वाचा : 'वाह रे MVA तेरा खेल, सस्ती दारु, महंगा तेल', देवेंद्र फडणवीसांची चौफेर टीका

यात वक्फ बोर्डाच्या चिंचपूर मस्जिद इनाम - 60 एकर, रुई नालकोल - बुहा देवस्थान - 103 एकर, देवीनिमगाव - मस्जिद इनाम - 50 एकर अशा दर्गा इनामच्या तीन देवस्थानांच्या 213 एकर जमिनीचा समावेश आहे. त्याचबरोबर हिंदू देवस्थानामधील मुर्शीदपूर येथील विठोबा देवस्थानची 41 एकर 32 गुंठे, खंडोबा देवस्थान 35 एकर, श्रीराम देवस्थान 29 एकर, कोयाळ येथील श्रीराम देवस्थान 15 एकर, चिंचपूर रामचंद्रदेव देवस्थान 65 एकर, बेळगाव खंडोबा देवस्थान ६० एकर आणि खडकत विठोबा देवस्थान 50 एकर अशी हिंदू देवस्थानांची 300 एकर जमीन खालसा करण्याचे काम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आले. अशी एकूण 513 एकर जमीन खालसा केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.

भाजपवर गंभीर आरोप

2017 सालापासून हा उद्योग सुरु असल्याचेही नवाब मलिक म्हणाले. 2017 पासून 2020 पर्यंत देवस्थानाच्या जमिनी हडप केल्या गेल्या आहेत. या प्रकरणाचा तपास योग्यरीतीने व्हावा यासाठी गृहमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी यासाठी एसआयटीची नेमणूक केली. एसआयटीने दोन गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे. राम खाडे यांनी गृह, महसूल आणि ईडीकडे या दहा प्रकरणांची तक्रार दाखल केली आहे. मच्छिंद्र मल्टिस्टेट को.ऑ.सोसायटीचा सहभाग या घोटाळ्यात आहे. या सर्व जागा खालसा करत असताना या कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून जे बगलबच्चे तयार करण्यात आले त्यांच्या खात्यात पैसे गेले. त्यातून खरेदी खत करण्यात आले. या सर्व प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस आणि माजी आमदार भीमराव धोंडे या दोन आमदारांचे नाव असल्याचा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे.

वाचा : राजकारणातील सर्वात मोठी बातमी ! शिवसेना युपीएत सहभागी होणार

काही दिवसांपूर्वी ईडीच्या माध्यमातून बातमी पेरली होती की वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापेमारी झाली आहे. आम्ही त्यावेळीच पत्रकार परिषद घेऊन याबाबत कोणतीही छापेमारी झाली नसल्याचा खुलासा केला होता. महाराष्ट्रामध्ये बोर्डाच्या माध्यमातून ११ एफआयआर दाखल केले आहेत. मंदिर आणि मशीदीच्या जागेवर फेरफार करुन, खासगी नावे चढवून प्लॉटिंग करत ही जमीन विकल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर नांदेड, औरंगाबाद, परभणी, जालना, पुणे, ठाणे आणि बीड जिल्ह्यात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, अशी माहितीही नवाब मलिक यांनी यावेळी दिली.

भाजप श्री रामाच्या नावाने राजकारण करतं. हेच भाजपचे नेते श्री राम देवस्थानची जागा हडप करत आहेत. विठोबा नावाच्या देवस्थानची जागा हडप करत आहेत. सात मंदिरांच्या ट्र्स्टच्या जागा हडपून हजारो कोटी रुपये लाटल्याचा धंदा भाजपने सुरू केला आहे.

First published:

Tags: BJP, Nawab malik, NCP