• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • वानखेडे स्टेडियममधील शानदार सोहळ्यात मानापमान नाट्य, जागा न मिळाल्यामुळे शेलार गैरहजर!

वानखेडे स्टेडियममधील शानदार सोहळ्यात मानापमान नाट्य, जागा न मिळाल्यामुळे शेलार गैरहजर!

मान्यवरांच्या मुख्य स्टेजवर बसण्यास मानाची जागा मिळाली नाही म्हणून आशिष शेलार नाराज होते.

मान्यवरांच्या मुख्य स्टेजवर बसण्यास मानाची जागा मिळाली नाही म्हणून आशिष शेलार नाराज होते.

मान्यवरांच्या मुख्य स्टेजवर बसण्यास मानाची जागा मिळाली नाही म्हणून आशिष शेलार नाराज होते.

  • Share this:
मुंबई, 29 ऑक्टोबर : मुंबईतील (mumbai) वानखेडे स्टेडियममधील (Wankhede Stadium) शानदार सोहळ्याला मानापमान नाट्याचं गालबोट लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आणि सुनील गावस्कर (sunil gavaskar) व सचिन तेंडुलकरच्या (sachin tendulkar) उपस्थितीत हा शानदार सोहळा रंगला. पण, भाजपचे आमदार आशिष शेलार (bjp mla ashish shelar) यांनी व्यासपीठावर जागा न मिळाल्यामुळे ते नाराज होऊ कार्यक्रमाला हजरच राहिले नाही. वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हस्ते, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावे "द सुनील गावस्कर हॉस्पिटॅलिटी बॉक्स" आणि माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या नावाने स्टेडियममधील नॉर्थ स्टँडचे "दिलीप वेंगसरकर स्टँड" असे नामकरण करण्यात आले. पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी दान केले 50 लाख; डॉक्टरही नसलेल्या गावात हॉस्पिटल या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची हजेरी आहे. पण, भाजपचे आमदार आणि मुंबई क्रिकेट असोशिएशनचे सदस्य आशिष शेलार यांना आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रण असूनही ते गैरहजर राहिले. आजच्या या सोहळ्याला भाजप पक्षाकडून फक्त आशिष शेलार यांनाच निमंत्रण होतं. मात्र, मान्यवरांच्या मुख्य स्टेजवर बसण्यास मानाची जागा मिळाली नाही म्हणून आशिष शेलार नाराज होते. त्यामुळेच ते आजच्या सोहळ्यास अनुपस्थित राहिल्याची सूत्रांची माहिती आहे. महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये 40 जागांसाठी भरती; या लिंकवर करा अप्लाय दरम्यान, यावेळी सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर यांच्यासह मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार जी. आर. विश्वनाथ, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी  रश्मी ठाकरे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ विजय पाटील, उपाध्यक्ष अमोल काळे, सचिव संजय नाईक, सहसचिव शाहआलम शेख, खजिनदार जगदिश आचरेकर, टी २०- गव्हर्निंग काऊन्सिलचे चेअरमन मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.
Published by:sachin Salve
First published: