ठाकरे सरकारचा डाव तर नाही ना? मेट्रो कारशेडवरून भाजप नेत्याची सडकून टीका

ठाकरे सरकारचा डाव तर नाही ना? मेट्रो कारशेडवरून भाजप नेत्याची सडकून टीका

विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि जनतेला भ्रमिष्ट करुन भटकवा अशा पद्धतीने हे सरकार काम करते आहे', अशी टीकाही शेलारांनी केली.

  • Share this:

मुंबई, 3 नोव्हेंबर : 'मेट्रो कारशेड (metro car shed ) आरेतून (aarey forest) कांजुरमार्ग येथे आणण्याबाबात निर्णय ज्या दिवशी ठाकरे सरकारने घेतला त्याच दिवशी आम्ही त्यातील ठाकरे सरकारची अहंकारी वृत्ती मांडली होती. आज फक्त केंद्राने पत्र दिल्यामुळे ती उघड पडली आहे, अशी टीका भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली.

'अहंकारी राजा आणि मनमौजी राजपुत्र यांच्यामुळे राज्याची अवस्था काय होते, अशा अनेक दंतकथा आपण ऐकल्या आहेतच. मुंबईकर नागरिकांना मेट्रोमुळे मिळणारा सुखाचा प्रवास यापासून वंचित ठेवण्याचे काम अहंकारी राजा आणि मनमौजी राजपुत्र करत आहेत. असे त्याच दिवशी आम्ही सांगितले होते' अशी टीका शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली.

'...तरच रोहित शर्माला टीम इंडियात जागा', गांगुलीचं मोठं विधान

'मेट्रो कारशेड कांजुरमार्गला करण्याचा निर्णय घोषित झाला आहे. त्याबाबत सरकारने काही खुलासे करण्याची गरज आहे. असे सांगत आम्ही प्रश्न उपस्थित केले होते त्याचा डीपीआर झालाय आहे का? त्याचा टेक्निकल स्टडी झाला आहे का? त्याचा ऑपरेशनल प्लॅन तयार झाला आहे का? या तिन्ही गोष्टींचा अभाव असताना केवळ एक वाक्य फेकायचं आणि जनतेला भ्रमीत करायचे असे चित्र आहे. शून्य पैशांमध्ये जागा ही केवळ घोषणा आहे. कारण ज्या जागेवर प्रस्तावित कारशेडचा मुद्दा राज्य सरकार म्हणते आहे, ती जागा मिठागरांची आहे, त्याबाबत मिठागर आयुक्तांकडून परवानगी घेतल्याचे दिसत नाही, त्यामुळे ती जागा जर राज्य सरकारने आपल्या नावावर केली असेल तर त्याच्या वैधतेवरच प्रश्न निर्माण होते, असा सवाल शेलारांनी उपस्थितीत केला.

पुणे हादरलं, भर चौकात भावानेच भावाला ट्रॅक्टरखाली चिरडलं

'मिठागरांचा जागांमधून केंद्र सरकार, राज्य सरकार यांचे गेल्या पंधरा वर्षात झालेले मंत्रिमंडळाचे गट, त्यातून मीठागरांची जागा कशी वापरावी याबाबतचा कोणताही निर्णय झाल्याचे ज्ञात नाही. तरीही एकांगीपणे राज्य सरकारने हा निर्णय घेतला याचा अर्थ राज्य सरकारच्या मनात छुपा डाव तर नाही ना? मिठागरांचा जागांवर अधिकार सांगणाऱ्या काही खाजगी मालकांना मेट्रोच्या निमित्ताने या जागा खुल्या करून देण्याचा हा राज्य सरकारचा डाव तर नाही ना?' असा सवालही शेलारांनी विचारला.

'राज्यातील तिघाडीचे सरकार केवळ जनतेचे नुकसान करते आहे. विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि जनतेला भ्रमिष्ट करुन भटकवा अशा पद्धतीने हे सरकार काम करते आहे', अशी टीकाही शेलारांनी केली.

Published by: sachin Salve
First published: November 3, 2020, 1:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या