S M L

लोकसभा निवडणुकीचे पडघम, भाजप आमदार-खासदारांची बैठक संपन्न

Updated On: Oct 9, 2018 11:07 PM IST

लोकसभा निवडणुकीचे पडघम, भाजप आमदार-खासदारांची बैठक संपन्न

प्रफुल्ल साळुंखे, 09 आॅक्टोबर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदार आणि खासदारांची विशेष बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत भाजपची संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा झाली.

भाजपच्या आमदार आणि खासदारांची विशेष बैठकीला दादरच्या वसंत स्मृती सभागृहात संपन्न झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे,हरीभाऊ बागडे यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी, 5 राज्यांच्या निवडणूक आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना यावर या बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. या बैठकीत भाजपची संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा झाली. राज्यात विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 31 ऑक्टोबरपर्यंत मतदार यादीत नवीन नावं नोंदणीची तारीख आहे यासाठी सक्रिय होण्यास आमदारांना सूचना देण्यात आल्यात अशी माहिती दानवेंनी दिली.तसंच दुष्काळाबाबतचा आढावा घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना आदेश दिले आहेत असंही दानवेंनी सांगितलं.पाच राज्याच्या निवडणुकांसाठी अद्याप महाराष्ट्रातून कोणाला जबाबदारी देण्याच्या केंद्रातून सूचना नाहीत अशी माहितीही त्यांनी दिली.

आम्ही सर्व वर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करतोय. यासाठी विविध कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्याबाबत आढावा घेण्यात आला असंही त्यांनी सांगितलं.

======================================================

Loading...

दोन महिन्यांवर होतं लग्न, धावती लोकल पकडताना गेला जीव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 9, 2018 11:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close