भाजपने घेतला मोठा निर्णय; प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती?

राज्य सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आता संघटनेची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2019 10:36 AM IST

भाजपने घेतला मोठा निर्णय; प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती?

मुंबई, 16 जुलै: राज्य सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आता संघटनेची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती होणार आहे. लवकर त्यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली जाणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे पाटील यांच्याकडील मंत्रिपद कायम ठेवत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे कळते.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने चंद्रकांत पाटील यांच्याकडे संघटनेची जबाबदारी देण्याचे ठरवले आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. तेव्हापासून प्रदेशाध्यक्षपद कोणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी येणार असल्याचे वृत्त कळताच कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यासंदर्भात अद्याप निर्णय झाला नसला तरी याबाबतची घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून हा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीनंतर दानवे केंद्रात मंत्री झाले त्यामुळे या पदावर नव्या व्यक्तीची नियुक्ती करावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये चर्चा सुरु होती. पण आता त्या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटनेची जबाबदारी पाटील यांच्याकडे द्यावी असा विचार पक्षात सुरु आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष हा स्थानिक असावा ज्यामुळे त्याला निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्रात फिरता येईल. या सर्व गोष्टींचा विचार करुनच चंद्रकांत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे सूत्रांकडून कळते. भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद हा नियम असताना देखील पाटील एकाच वेळी दोन पदांवर कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील गृहमंत्रीपद आणि पक्षाचे अध्यक्षपद आहे.

मुख्यमंत्रिपदावरून युतीत वादाची ठिणगी; नाशिकमध्ये शिवसेनेकडून पोस्टरबाजी

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 10:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...