मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

‘आधी घर सांभाळा’, राष्ट्रवादीच्या 'मिशन घरवापसी'वर भाजपचा पलटवार

‘आधी घर सांभाळा’, राष्ट्रवादीच्या 'मिशन घरवापसी'वर भाजपचा पलटवार

'जयंत पाटील आणि अजित पवार यांनी स्वत:च्या पक्षात जरी संवाद साधला तरी खूप आहे.'

'जयंत पाटील आणि अजित पवार यांनी स्वत:च्या पक्षात जरी संवाद साधला तरी खूप आहे.'

'जयंत पाटील आणि अजित पवार यांनी स्वत:च्या पक्षात जरी संवाद साधला तरी खूप आहे.'

मुंबई 13 ऑगस्ट: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना (NCP Leaders) पुन्हा पक्षात आणण्यासाठी 'मिशन घरवापसी'च्या (Mission Gharwapsi) मुद्यावर भाजपने (BJP) पलटवार केला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish shelar) यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केलीय. ते म्हणाले, राष्ट्रवादीने आधी आपलं घर सांभाळावं आणि नंतर भाजपवर बोलावं. आपला पक्ष फुटू नये म्हणूनच राष्ट्रवादीचे नेते अशा पद्धतीने अफवा पसरवत असल्याचंही ते म्हणाले. शेलार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या घरातला भेद आणि विसंवाद  लपवण्यासाठी भाजपचे आमदार राष्ट्रवादीत परत येणार अशा अफवा पसरवण्याचं काम राष्ट्रवादीकडून अतिशय योजनाबद्ध पद्धतीने सुरु आहे. या प्रयत्नाला कोणतंही यश मिळण्याची शक्यता दुरान्वयेही नाही. जयंत पाटील आणि अजित पवार यांनी स्वत:च्या पक्षात जरी संवाद साधला तरी खूप आहे असा यांचा खोचक टोलाही शेलार यांनी लगावला. आधी स्वत:चं सरकार आणि स्वत:चा पक्ष वाचवा असंही ते म्हणाले. भाजपला ना कोणाचा परिवार फोडण्याची इच्छा नाही ना सरकार पाडापाडीत रस आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. चर्चा का सुरु झाली? 'भाजपमध्ये जे आमदार गेले त्यांना तिथं किंमत नाही. त्यामुळे ते पुन्हा एनसीपी पक्षात येऊ पाहत आहेत. हे आमदार शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत संपर्कात आहेत. असे आमदार स्थानिक राजकारणाचा विचार करून पक्ष प्रवेश करत आहेत,' असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. Good News: कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, एकनाथ शिंदेंची माहिती दरम्यान, यावेळी नवाब मलिक यांनी पार्थ पवार यांच्याबाबतही भाष्य केलं आहे. 'पार्थ तरूण नेते आहेत. त्यांचा अनुभव कमी. पार्थ वक्तव्य गांभीर्य घेण्यासारखे नाही. तरुणांकडून चूका होतात त्यात सुधारणा करता येतात,' असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात, प्रकृती आणखी खालावली शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात काल (बुधवारी) एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत नेत्यांच्या घरवापसीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तीनही पक्षाचं राजकारण, पक्षाची ताकद पाहून गयारामांना पुन्हा प्रवेश दिला जाणार असल्याचं कळतंय.
First published:

Tags: BJP, NCP

पुढील बातम्या