भाजप नेत्यांना सत्तेचा आजार, रात्रीही पडतं खुर्चीच स्वप्न; राष्ट्रवादीचा घणाघात

भाजप नेत्यांना सत्तेचा आजार, रात्रीही पडतं खुर्चीच स्वप्न; राष्ट्रवादीचा घणाघात

'भाजपच्या नेत्यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले पाहिजे. अशा नेत्यांची जास्त काळजी वाटते. त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे.'

  • Share this:

मुंबई 17 फेब्रुवारी : भाजपच्या राज्यव्यापी मेळाव्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. त्याला आता राष्ट्रवादीने उत्तर दिलंय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे नेते आणि फडणवीसांवर सडकून टीका केलीय. भाजप नेत्यांना सत्तेचा आजार झाला आहे,दिवसभर सत्तेत कसा येऊ याचा विचार करतात, रात्री स्वप्न पडतात अशी टीका त्यांनी केलीय. हिंमत असेल तर भाजपने लोकसभेची निवडणूक घेऊन दाखवावी असं आव्हानही त्यांनी दिलं.

नवाब मलिक म्हणाले, भाजपचा हा सत्तेचा आजार वाढत जाणारा आहे. भाजपच्या नेत्यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले पाहिजे. अशा नेत्यांची जास्त काळजी वाटते. त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे. आणि उपचारही केले पाहिजेत असंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना इतकंच सांगू की हिंमत असेल तर लोकसभा निवडणूक आता घ्या आणि सिद्ध करा.

काय म्हणाले होते फडणवीस?

देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या राज्यव्यापी शिबिराचा समारोप करताना म्हणाले, 'तुमच्यात हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लढून दाखवा. आम्ही एकटे असलो तरी तुम्हा तिघांना पुरुन उरू,' असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. आम्ही सरकार खाली खेचणार नाही, पण तुमची हिंमत असेल तर चला पुन्हा लोकांच्या कोर्टात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

VIDEO ''हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय'', ऐकणाऱ्यालाच बसला शॉक

नवी मुंबईत झालेल्या भाजपच्या अधिवशेनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीतील इतर नेत्यांवर जोरदार टीका केली. 'सावरकरांवर टीका करणाऱ्यांना हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेस्तनाबूत करायचे. मात्र आता सावकरांचा अपमान रोज काँग्रेस करत आहे. हिंमत असेल तर शिदोरी मासिकावर बंदी घाला,' असं आव्हान देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे.

हेही वाचा...

मिलिंद देवरांचं राजकारण वडिलांच्या जीवावर, काँग्रेसच्या महिला नेत्याचा आरोप

'सारथी'चा घोळ: स्कॉलरशिप रखडली, दिल्लीतल्या 300 मराठा विद्यार्थ्यांना फटका

First published: February 17, 2020, 12:01 PM IST

ताज्या बातम्या