मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री थेट पोलीस स्थानकात एण्ट्री, अधिकाऱ्यांवर का भडकले? पाहा VIDEO

देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री थेट पोलीस स्थानकात एण्ट्री, अधिकाऱ्यांवर का भडकले? पाहा VIDEO

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadanvis Police Station Video) तसंच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी थेट पोलीस स्थानकात धाव घेतली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadanvis Police Station Video) तसंच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी थेट पोलीस स्थानकात धाव घेतली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadanvis Police Station Video) तसंच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी थेट पोलीस स्थानकात धाव घेतली.

मुंबई, 18 एप्रिल : ब्रूक फार्माचे राजेश डोकनिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadanvis Police Station Video) तसंच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी थेट पोलीस स्थानकात धाव घेतली. या दोन्ही नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर डोकनिया यांना पोलिसांकडून रात्री उशिरा सोडण्यात आलं आहे.

बीकेसी पोलीस ठाण्यात फडणवीस यांच्यासह विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा आमदार पराग अळवणी, आमदार प्रसाद लाडही सोबत होते. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या (Remdesivir Injection) साठ्या संदर्भात डोकनिया यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. मात्र भाजप नेत्यांनी पोलीस स्थानकात दाखल होत आक्रमक भूमिका घेतली. या सर्व घटनाक्रमानंतर राजेश डोकनिया यांना सोडून देण्यात आलं.

देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर घणाघात

पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बाहेर पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे. 'महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे. एका मंत्र्यांचा ओएसडी दुपारी फोन करून धमकी देतो आणि विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून तुम्ही रेमडेसिवीर देऊच कसे शकता, असा जाब विचारतो आणि संध्याकाळी 10 पोलीस त्यांना ताब्यात घेतात, हे सारेच अनाकलनीय आहे. आज पोलीस ठाणे आणि उपायुक्त कार्यालयात जाऊन याचा जाब विचारला,' अशी माहिती माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

हेही वाचा - 'दबाव टाकला जातोय', ऑक्सिजन खरेदीवरुन शिवराज सिंह चौहानांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

'महाराष्ट्र आणि दमणच्या परवानग्या घेतल्या असताना, अधिकाधिक रेमडेसिवीर महाराष्ट्राला द्या, असे स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी या कंपनीला सांगितले असताना, इतक्या गलिच्छ पातळीवर राजकारण होत असेल, तर हे फारच गंभीर आहे. झालेली घटना योग्य नाही आणि ती कायद्यानुसार नाही, एवढेच म्हणेन,' अशा शब्दांत फडणवीस यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

First published:
top videos

    Tags: Devendra Fadnavis, Mumbai police