संभाजीराजेंच्या 'त्या' Tweet ला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

संभाजीराजेंच्या 'त्या' Tweet ला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

ज्यांचा छत्रपतींच्या कुटुंबाशी संबंध आहेत. त्यांनी नाराज होण्याचे कारण नाही. किंबहुना त्यांनी परखड भूमिका घ्यावी ही जनतेची भावना आहे.

  • Share this:

मुंबई, 13 जानेवारी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केल्यामुळे विरोधकांनी भाजपवर सडकून टीका केली. यादरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे खासदार संभाजीराजे यांच्यात चांगलीच जुंपली होती.आता पुन्हा एकदा संजय राऊतांनी संभाजीराजेंवर शरसंधान साधले आहे.

जय भगवान गोयल यांच्या पुस्तकाबाबत आम्ही भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव आहे. त्यांची तुलना आम्ही कुणाशी सहन करू शकत नाही. आता आम्ही काही मुद्दा मांडला की भाजपचे नेते तडातडा उडतात आमचे भाजपशी काही व्यक्तिगत वैर नाही. भूमिकेबाबत आम्ही बोलतो. त्यांच्या पक्षात जे लोक आहेत. ज्यांचा छत्रपतींच्या कुटुंबाशी संबंध आहेत. त्यांनी नाराज होण्याचे कारण नाही. किंबहुना त्यांनी परखड भूमिका घ्यावी ही जनतेची भावना आहे. जे आम्ही म्हणालो तर संजय राऊत गरळ ओकत आहेत. हे म्हणणे म्हणजे छत्रपतींचा अपमान आहे. आम्ही छत्रपतींच्या प्रतिष्ठेची भाषा करीत होतो. आणि तुम्हाला गरळ ओकणे वाटत असेल ते सर्व महाराष्ट्राच्या जनतेनं ऐकले आहे,  अशा शब्दात संजय राऊत यांनी पलटवार केला.

'जिथे भाजपची राज्य असतात तिथे सर्वात हिंसक आंदोलनं'

याआधी मुख्यमंत्र्यांनी CAA बद्दल भूमिका स्पष्ट केली. हा कायद्यायत काही त्रुटी आहे त्या दूर व्हाव्यात. देश भरात जे वादळ या कायद्यावरून निर्माण झालाय ते पाहता सर्व स्तरातून त्याला विरोध होतोय. या कायद्याने हिंदू-मुसलमान अशी विभागणी करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्याला यश आलं नाही. राज्यात सर्व जाती धर्माचे लोक असतात. जिथे भाजपची राज्य असतात तिथे सर्वात हिंसक आंदोलनं झाली. हे पाहता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी भूमिका घेतली की हा कायदा जबरदस्तीनं लादला जाणार नाही. जोपर्यंत काही गोष्टींवर खुलासा होत नाही आणि जे देशाचे नागरिक आहेत. त्यांच्या केसाला धक्का लागू देणार नाही. मग ते कोणत्याही जाती धर्माचे असतो इतकी स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर आमचे कुणाशी मतभेद असल्याचा प्रश्नच येत नाही, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसचा महाराष्ट्रात कायदा अंमलबजवणी दबाव आहे का असा सवाल विचारला असता राऊत म्हणाले की, 'कायद्यात काही त्रुटी आहे शंका आहेत त्या दूर करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. आहे त्या परिस्थितीत कायदा कोणावर लादता येणार नाही. त्यामुळे प्रश्न दबावचा नाही मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या स्पष्ट भूमिकेचा आहे त्यामुळे दबाव या शब्दाचे प्रयोजन योग्य नाही.'

संभाजीराजे आणि संजय राऊत आमनेसामने

दरम्यान, भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिलेलं 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकाचं रविवारी प्रकाशित करण्यात आलं. यावर संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे  आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांना सवाल केला होता.

त्यांच्या या प्रश्नामुळे संभाजीराजे चांगलेच संतापले. संभाजीराजे यांनी ट्वीट करून थेट संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.  "उद्धवजी त्या संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करताय. त्यांनी आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंती निमित्त सिंदखेड राजामध्ये काय बोललो आहे ते, अशी त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.

 काय म्हणाले होते संजय राऊत?

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे  आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांना सवाल केला."शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली, हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का?," असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

तसंच, 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महशय कोण आहेत? हेच ते जयभगवान गोल. यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला आणि मराठी  माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजप, असं म्हणत संजय राऊत यांनी सडकून टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2020 04:47 PM IST

ताज्या बातम्या