Home /News /mumbai /

भाजपचे सांबित पात्रा अडचणीत, मुंबईतील पोलीस स्थानकात NCR दाखल

भाजपचे सांबित पात्रा अडचणीत, मुंबईतील पोलीस स्थानकात NCR दाखल

सरकार गरीबांच्या नावावर योजना तर आखते पण याचा फायदा त्यांना मिळतो का? गरीब बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी तयार केलेली वीर चंद्र सिंह गढवाली योजनेचा लाभ भाजप आमदाराच्या पत्नीला दिला जात आहे.

सरकार गरीबांच्या नावावर योजना तर आखते पण याचा फायदा त्यांना मिळतो का? गरीब बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी तयार केलेली वीर चंद्र सिंह गढवाली योजनेचा लाभ भाजप आमदाराच्या पत्नीला दिला जात आहे.

ट्विटरवरून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत त्यांच्यावर मुंबईतील एका पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  मुंबई, 12 मे : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सांबित पात्र अडचणीत आले आहेत. कारण ट्विटरवरून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत त्यांच्यावर मुंबईतील एका पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहलाल नेहरू आणि राजीव गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान ट्विटरद्वारे केले आहे, असं म्हणत महाराष्ट्र युवक काँग्रेसने त्यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. 'आज संपूर्ण देश कोरोना सारख्या गंभीर महामारीचा सामना करत आहे. केंद्र सरकारने चुकीच्या पद्धतीने लॉकडाऊन लागू केल्यामुळे हजारो कामगार रस्त्यावर उतरून आपआपल्या घरी पायी निघाला आहे. मजूर, महिला, लहान मुले उन्हामध्ये अनवाणी चालत प्रवास करत आहे, या गंभीर संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरल्याने जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजपचे नेते करत आहे. कालच भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहलाल नेहरू व राजीव गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान ट्विटरद्वारे केले आहे, या संपूर्ण प्रकरणाचा निषेध महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस करते, तसेच याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये केली असून NCR देखील दाखल केले आहे,' अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस ब्रीजकिशोर दत्त यांनी दिली आहे. दरम्यान, 1984 साली दिल्लीमध्ये उसळलेल्या दंगलीला राजीव गांधी हेच जबाबदार असल्याचा आरोप करत सांबित पात्रा यांनी एकामागोमाग एक असे अनेक ट्वीट्स केले आहेत. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभर पात्रा यांच्याविरोधात तक्रारी दिल्या आहेत. संपादन - अक्षय शितोळे

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: BJP

  पुढील बातम्या