'सरकार नैतिकतेला धरून नाही! संजय राऊतांनी बोलण्यावर मर्यादा ठेवणे हिताचं'

'सरकार नैतिकतेला धरून नाही! संजय राऊतांनी बोलण्यावर मर्यादा ठेवणे हिताचं'

संजय राऊतांनी त्यांच्या बोलण्यावर मर्यादा ठेवल्या, तर ते त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्याही हिताचे ठरेल

  • Share this:

प्रदीप भणगे,(प्रतिनिधी)

कल्याण,30 नोव्हेंबर:महाविकास आघाडीचे सरकारच आज (30 नोव्हेंबर) अग्निपरीक्षा अर्थात विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार आहे. याआधी माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांच सरकारवर खोचक टीका केली आहे. सत्तेवर आलेले सरकार नैतिकतेला धरून नाही! शिवसेना नेते संजय राऊत यांनी बोलण्यावर मर्यादा ठेवल्यास हिताचं होईल, असाही टोला राम नाईक यांनी लगावला आहे.

मतदारांनी महायुतीला कौल दिलेला असताना राज्यात स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार हे नैतिकतेला धरून नसल्याची टीका माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी केली आहे. कल्याणमध्ये आयोजित रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमालेत राम नाईक बोलत होते.

राज्यात मागील एक महिन्यात जे घडले ते योग्य नाही, असेही राम नाईक म्हणाले. मात्र दुसरीकडे आता जे होऊन गेले आहे. त्यावर अधिक चर्चा करत बसण्यापेक्षा त्यातून शिकून पुढे जायला हवे, असा सल्लाही राम नाईक यांनी दिला. तर गोव्याच्या संभाव्य सत्तांतराबाबतच्या संजय राऊत यांच्या विधानाबाबत नाईक यांना विचारले असता त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत गोव्यालाच काय कुठेही जाऊ शकतील, मात्र अशी सगळी विधाने करताना राऊतांनी त्यांच्या बोलण्यावर मर्यादा ठेवल्या, तर ते त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्याही हिताचे ठरेल, असे राम नाईक यांनी सांगितले.

दरम्यान, एका खासगी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात वीजपुरवठा खंडित झाल्याने 85 वर्षांच्या राम नाईक यांनी मोबाइलच्या टॉर्चवर भाषण केले. त्यांच्या या उमदेपणाला कल्याणकरांनीही चांगली दाद दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2019 09:18 AM IST

ताज्या बातम्या