Home /News /mumbai /

swapnil lonkar suicide case स्वप्निलच्या आत्महत्येला राज्य सरकारचा बेफिकीरपणा जबाबदार, भाजप नेत्याचा आरोप

swapnil lonkar suicide case स्वप्निलच्या आत्महत्येला राज्य सरकारचा बेफिकीरपणा जबाबदार, भाजप नेत्याचा आरोप

'प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात आहे. त्यामुळे आता तरी राज्य सरकारने जागे व्हावे'

    मुंबई, 04 जुलै : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यात एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या तरुणाच्या आत्महत्येला राज्य सरकारचा बेफिकिरपणा जबाबदार आहे, असा गंभीर आरोप भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (praveen darekar) यांनी केला. पुण्यातील MPSC चा विद्यार्थी स्वप्नील लोणकर आत्महत्या (swapnil lonkar suicide case) प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. भाजपच्या नेत्यांनी ठाकरे सरकारवर आरोपास्त्र सोडले आहे. एकच नंबर! महाराष्ट्रानं करुन दाखवलं, लसीकरणात राज्याची विक्रमी नोंद पुण्यातील आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. एमपीएससी संदर्भात राज्य सरकारनं दुर्लक्ष करु नये. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही दीड वर्षे झाले तरी त्या युवकाला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलले आहे, अशी टीका दरेकर यांनी केली. तसंच, 'कोरोनामुळे स्थगित केलेली MPSC ची परीक्षा, प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात आहे. त्यामुळे आता तरी राज्य सरकारने जागे व्हावे आणि आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन परीक्षा व नोकरीसाठी तात्काळ उपाय योजना व अंमलबजावणी करा, अशी मागणीही दरेकर यांनी केली. तर भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रशासकीय व्यवस्थेवर बोट ठेवले आहे. 'MPSC ची परीक्षा पास होऊन देखील नोकरी नाही मिळाली म्हणून स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. मन सुन्न करणार्‍या या घटना सांगतात, योग्य निर्णय योग्य वेळी नाही घेतला तर निष्पाप लोकांचे जीवन उद्ध्वस्त होते. जबाबदारी कोणाची व्यवस्थेची ना? असा सवाल पंकजा मुंडेंनी उपस्थितीत केला. सरकारी नोकरी: रेल्वेत स्टेशन मास्टर पदासाठी होणार भरती; या वेबसाईटवर करा अप्लाय तर,भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही तीव्र वेदना व्यक्त करत ठाकरे सरकाराला सूचना केली आहे. 'स्वप्नील लोणकर आत्महत्या केल्याची घटना दुर्देवी आहे, एकूणच MPSC च्या कार्यपद्धतीचे नव्याने अवलोकन करणे आवश्यक आहे, अनेक जागा रिक्त आहेत, परीक्षा उशिरा होतात, अनेक तरुण स्वायत्तता हवी आहे पण स्विराचार नको आहे', असं फडणवीस म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या