प्रवीण दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल, 3 मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंवर बरसले

प्रवीण दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल, 3 मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंवर बरसले

उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना जनतेचा भ्रमनिरास केला आहे, अशी टीका त्यांनी केली.

  • Share this:

मुंबई, 11 ऑक्टोबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे साधलेल्या संवादावर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत खरपूस समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना जनतेचा भ्रमनिरास केला आहे, अशी टीका त्यांनी केली.

मंदिर, लोकल ट्रेन आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून प्रवीण दरेकर आक्रमक

मंदिरं खुली करण्यावरून भाजपने राज्यभरात आक्रमक भूमिका घेतली असतानाच प्रवीण दरेकर यांनीही या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. 'मंदिर उघडण्याची मागणी होत असताना एका बाजूला दारुची दुकाने उघडली जात आहेत.पण सरकार मंदिरे उघडणार नाहीत असे सांगत आहे. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बदलले वैचारिक स्वरुप राज्यातील जनतेसमोर आलं आहे,' असा घणाघात दरेकर यांनी केला.

पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, 'लोकल सुरू करण्याची मागणी होत असताना आज उपासमारीने नागरिक हैराण आहेत. उद्योगधंदे बंद पडले आहेत. कोरोनाने मरण्यापेक्षा उपासमारीने मरणार की काय अशी परिस्थिती असताना लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत कुठलीही भूमिका घेतलेली नाही, यावरुन जनतेच्याबाबतची संवदेना दिसून येते.

शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही असे मुख्यमंत्री म्हणतात, परंतु पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र गेल्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर इतक्या महिन्यात पूर्णपणे मराठवाडा अतिवृष्टीने शेतकऱ्यांची शेती उध्दवस्त झाली आहे. पंचनामे झाले नाहीत. तो शेतकरी मदतीची वाट पाहत आहे, पण त्याला वाऱ्यावर सोडले आहे, अशी स्थिती असताना केवळे शेतक-याला वाऱ्यावर सोडले आहे असे बोलून चालत नाही. केवळ बोलाची कडी व बोलाचाच भात यांच्या वक्तव्यावरुन दिसून येते. उक्ती व कृती याचा फरक यामधून दिसत आहे," अशा शब्दांत दरेकर यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

Published by: Akshay Shitole
First published: October 11, 2020, 11:55 PM IST

ताज्या बातम्या