Home /News /mumbai /

प्रवीण दरेकरांच्या सुरक्षेत मोठी कपात, आता फक्त एकच हवालदार दिमतीला!

प्रवीण दरेकरांच्या सुरक्षेत मोठी कपात, आता फक्त एकच हवालदार दिमतीला!

राज्य सरकारची महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांपासून ते विरोधी पक्षातील नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मुंबई, 15 जानेवारी : राज्यातील विरोधी पक्षातील नेते आणि दिग्गज व्यक्तींच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय अलीकडेच राज्य सरकारने जाहीर (MVA Goverment) केला आहे. तर  भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांच्या पोलीस सुरक्षेत आता पुन्हा एकदा मोठी कपात करण्यात आली आहे.  दरेकर यांच्या सुरक्षेसाठी आता फक्त एकच हवालदार देण्यात आला आहे. राज्य सरकारची महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांपासून ते विरोधी पक्षातील नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचीही सुरक्षा कमी करून त्यांना  वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. पण, हा निर्णय जाहीर झाल्यानंतर दरेकर यांच्या सुरक्षेत आणखी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरेकर यांची वाय सुरक्षा हटवण्यात आली आहे.  आता दरेकर यांच्या सुरक्षेसाठी एकच पोलीस हवालदार दिमतीला असणार आहे. Inspiring Story: NRI पतीनं तिला सोडलं, तिनं जिद्दीनं मिळवलं हे झळाळत त्याआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडी काढण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली. त्याचबरोबर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. ती आता काढून घेण्यात आली. 'मला तू खूप आवडते'; तरुणीने मेसेजला दिला अस्सा रिप्लाय की आयुष्यभर विसरणार नाही महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांची सुरक्षा कपात केली नसून काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, संजय बनसोडे यांच्या सुरक्षेत देखील कपात केली. त्याचबरोबर काँग्रेसचे माजी मुंबई शहर अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या सुद्धा सुरक्षा काढून घेण्यात आली. राज्यातील नेत्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेचा वारंवार आढावा घेतला जात असतो. त्यानुसार पुढील काही निर्णय घेतले जात असतात. याबद्दलच आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या