उशिरा हा होईना शहाणपण सुचले, भाजपचा ठाकरे सरकारला टोला

उशिरा हा होईना शहाणपण सुचले, भाजपचा ठाकरे सरकारला टोला

'खरंतर हा निर्णय आधीच व्हायला पाहिजे होते. कारण लॉकडाउनच्या सात महिन्यानंतर मॉल, हॉटेल, बार सगळं काही सुरू करण्यात आले होते'

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर : गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली मंदिरं ( temples )अखेर पाडव्यापासून उघडण्यात येणार आहे. ठाकरे सरकारला (thackeray government ) उशिरा का होईना शहाणपण सुचले आहे, असं म्हणत भाजपचे (BJP) विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी टोला लगावला आहे.

राज्यातील मंदिरं कधी उघडणार? असा सवाल करत भाजपने राज्यभरात आंदोलनं केली होती. अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाडव्यापासून मंदिरं उघडणार असल्याची घोषणा केली. मंदिरं उघडण्याच्या मुद्यावर प्रतिक्रिया देत प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

'उशिरा हा होईना या सरकारला शहाणपण सुचले आहे, महाराष्ट्रातील लाखो वारकरी, हिंदू प्रेमी, मंदिरांच्या परिसरात काम करणाऱ्या व्यापाऱ्यांची ही मागणी होती, अखेर त्यांच्या रेट्यापुढे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला, उशिरा का होईना सरकारने हा  निर्णय घेतला आहे, त्याचे आपण स्वागत करतो, असं दरेकर म्हणाले.

नदीत मासे पकडताना काट्यात अडकली मगर; शेवटी रुग्णालयातच करावी लागली रवानगी

'खरंतर हा निर्णय आधीच व्हायला पाहिजे होते. कारण लॉकडाउनच्या सात महिन्यानंतर मॉल, हॉटेल, बार सगळं काही सुरू करण्यात आले होते. त्याचबरोबर इतर सार्वजनिक स्थळं मोकळी करण्यात आली होती. फक्त अहंकारातून आणि प्रतिष्ठेपोटी या ठिकाणी हा निर्णय होत नव्हता, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

मुख्यमंत्री ठाकरे यांचा आवाहन

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरं उघडण्याची घोषणा करत काही नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

'राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मियांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळली. या पुढेही जनतेनं शिस्त पाळायची आहे. नागरिकांनी मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे, हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

सतत 2 वर्ष घेत होती ड्रग्स, अशी झाली अवस्था; पण 4 महिन्यात बदललं अख्खं आयुष्य

'कोरोनाच्या काळात राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने 'देव' पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा', असंही आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

Published by: sachin Salve
First published: November 14, 2020, 4:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या