• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • 'खडसेंकडे 10 तर पंकजा मुंडेंकडे महत्त्वाचे खाते दिले होते', दरेकरांचं सेनेला प्रत्युत्तर

'खडसेंकडे 10 तर पंकजा मुंडेंकडे महत्त्वाचे खाते दिले होते', दरेकरांचं सेनेला प्रत्युत्तर

'संजय राऊत यांनी शिवसेनेची काळजी करावी जेणे करून शिवसैनिक त्यांना धन्यवाद देतील'

 • Share this:
  मुंबई, 28 जून : 'एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्याकडे दहा खाती दिली होती. पंकजा मुंडे (pankaja munde) यांना महत्वाचं ग्रामीण विकासचं खातं दिलं होतं. आज ही त्या नेतृत्व करत आहेत. आज देशाचे पंतप्रधानच ओबीसी आहे, याहून मोठा सन्मान काय असेल', असं म्हणत भाजपचे विधान परिषदेचे  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (praveen darekar) यांनी सेनेला प्रत्युत्तर दिलं. प्रवीण दरेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सामनाच्या अग्रलेखावर प्रतिक्रिया देत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.  'वाघ कधी कुणाच्या इशाऱ्यावर चालत नाही तो फक्त सर्कसमध्येच चालतो. निधर्मवादीचे ढोल बडवणाऱ्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अंतर्गत धुसफूस आहे, अशी टीका दरेकर यांनी केली. गोपी बहु संस्कार विसरली का? बेली डान्समुळं देवोलिना होतेय ट्रोल भाजपने ओबीसी नेत्यांना डावलले असा आरोप केला जात आहे. पण, फडणवीस सरकार सत्तेत होतं तेव्हा एकनाथ खडसे यांच्याकडे दहा खाती दिली होती. पंकजा मुंडे यांना महत्वाचं ग्रामीण विकासचं खातं दिलं होतं. आज ही त्या राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करत आहेत. एवढंच नाहीतर आज देशाचे पंतप्रधानच ओबीसी आहे, याहून मोठा सन्मान काय असेल', असंही दरेकर म्हणाले. 'महाविकास आघाडी सरकारमुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. या सरकारने त्यांचा अवमान केला आहे. त्यामुळेच विजय वडेट्टीवार यांची नाराजी समोर आली आहे', असंही दरेकर म्हणाले. सर्वात हलका आणि पातळ स्मार्टफोन; 64 MP कॅमेरासह मिळतील जबरदस्त फीचर्स,पाहा किंमत 'संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची काळजी घेण्याची गरज नाही. ते स्वत: ची काळजी घेण्यासाठी भक्कम आहे.  संजय राऊत यांनी शिवसेनेची काळजी करावी जेणे करून शिवसैनिक त्यांना धन्यवाद देतील, असा टोलाही दरेकरांनी लगावला. 'राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार अशी चर्चा आहे. पण, अनेक जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे. त्यामुळे  लॉकडाऊन शिथिल करायला पाहिजे. लोकांमध्ये आक्रोश आहे. सरकारने काढलेले आदेश जनतेचा विचार केलेला नाही', असंही दरेकर म्हणाले. काय लिहिलं होतं सामनामध्ये? 'बावनकुळेंचे कौतुक आज भाजप करीत आहे, पण ओबीसींचे नेते बावनकुळे यांच्या आमदारकीचे तिकीट कापून ‘ओबीसी’ नेतृत्वाचे पंख कापणारे हात कोणाचे होते, हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळूद्या! बावनकुळे, खडसे हे ओबीसींचेच नेतृत्व होते व ते मोडून काढले. आज रस्त्यांवर गर्दी जमवून आदळआपट करून काय साध्य करणार? असा थेट सवाल सेनेनं भाजपला विचारला.
  Published by:sachin Salve
  First published: