सावरकरांच्या अपमानावरून पंकजा मुंडे यांनी साधला राहुल गांधींवर निशाणा

सावरकरांच्या अपमानावरून पंकजा मुंडे यांनी साधला राहुल गांधींवर निशाणा

'महात्म्यांचा अपमान त्यांचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केल्याने होतोच..प्रचंड संताप ही होतो. सर्वांना होतो. त्यांच्या नावाच्या राजकारणाने पीडा ही होते.'

  • Share this:

मुंबई 16 डिसेंबर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकरांचा उल्लेख केल्याने देशभर प्रचंड वादळ निर्माण झालं. भाजपने अतिशय जोरदारपणे हा विषय उचलून धरलाय. राहुल गांधी यांच्यावर टीका होतेय. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय. त्या म्हणाल्या, "सागरा प्राण तळमळला" या देशात तरुणांना काय हवंय.. 1947पूर्वी स्वातंत्र्य हवं होतं,आता स्थैर्य हवं आहे. महात्म्यांचा अपमान त्यांचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केल्याने होतोच..प्रचंड संताप ही होतो..सर्वांना होतो.. त्यांच्या नावाच्या राजकारणाने पीडा ही होते.. कधी आपण संवेदनशील होऊन देशाच्या पुढील पिढीसाठी योगदान देणार ???..जसे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले.

विधानसभेत आज भाजपने सावरकरांचा मुद्दा जोरकसपणे लावून धरला होता. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणीही भाजपने केलीय.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होताच सभागृहात मोठा गदारोळ झाला. कारण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांचा अपमान केला आहे, असा आरोप करत भाजपने सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र विरोधकांच्या गदारोळातही सरकारकडून कामकाज सुरू ठेवण्यात आलं आहे.

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात आजपासून सुरू झालं आहे. हे अधिवेशन आठवडाभर चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदारांनी 'मी पण सावरकर' अशा टोप्या घालत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. तसंच राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे आगामी काळातही याच मुद्द्यावरून भाजप सरकारला लक्ष्य करणार असल्याचं दिसत आहे.

अधिवेशनातील रणनीतीचा भाग म्हणून, सावरकरांचा मुद्दा हा राज्यभर तापवण्याची योजना भाजपने आखली आहे. भाजप राज्यभर 'मी सावरकर, आम्ही सगळे सावरकर' कँपेनला सुरुवात केली आहे. याआधी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सावरकरांच्या मुद्यांवर तडजोड नाही असं काँग्रेसला सुनावलं होतं. त्याचबरोबर सावरकर हे महान देशभक्त होते. आम्ही नेहरूंना, गांधी मानतो, तुम्ही सावरकरांना माना असं म्हटलं होतं. काँग्रेस-शिवसेनेच्या या मतभेदांचा फायदा घेत दोन्ही पक्षांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2019 10:18 PM IST

ताज्या बातम्या