आदित्य ठाकरेंसोबत काम करण्यास तयार, नितेश राणेंनी पुढे केला मैत्रीचा हात

आदित्य ठाकरेंसोबत काम करण्यास तयार, नितेश राणेंनी पुढे केला मैत्रीचा हात

'आदित्य यांची विधानसभेच्या पायऱ्यांऱ्यांवर भेट व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्यांनी घेतलेली भूमिका अतिशय सकारात्मक आहे.'

  • Share this:

मुंबई 13 ऑक्टोंबर :  नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधलं राजकीय वैर जगजाहीर आहे. शिवसेनेतून बाहेर गेलेल्या अनेक नेत्यांनी नंतर उद्धव ठाकरेंबाबत नरमाईची भूमिका स्वीकारली. मात्र नारायण राणे यांचा कडवटपणा तसाच कायम राहिला. मात्र बदली राजकीय परिस्थिती आणि काळाची गरज बघून नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी आपल्या भूमिकेत पूर्णपणे बदल केलाय. पुढच्या काळात आदित्य ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नितेश राणे हे कणकवलीतून भाजपचे उमेदवार आहेत. मात्र कणकवलीत शिवसेनेनं बंडखोरी केलीय. अशा परिस्थिती असतानाही कायम आक्रमक असणाऱ्या नितेश राणे यांनी नरमाईची भूमिका स्वीकारलीय.

चंद्रावर जाऊन तरुणांचं पोट भरणार का? राहुल गांधींचा मोदींना सवाल!

'बीबीसी मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आदित्य यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला. ते म्हणाले, राज्याच्या विकासासाठी आदित्य ठाकरेंसोबत सहकार्य आणि  काम करण्यास तयार आहे. आदित्य यांची विधानसभेच्या पायऱ्यांऱ्यांवर भेट व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्यांनी घेतलेली भूमिका अतिशय सकारात्मक आहे.

शरद पवार राजकारणातले 'नटरंग', त्यामुळेच ते 'हातवारे' करताहेत - मुख्यमंत्री

आदित्य हे कायदे करण्यासाठी, विधानसभेचं कामकाज समजून घेण्यासाठी जर निवडणूक लढवित असतील तर त्यांचं स्वागतच करायला पाहिजे असंही ते म्हणाले. शिवसेनेने कणकवलीत बंडखोरी केलेली असतानाही शिवसेनेवर टीका करणार नाही असं नितेश राणे म्हणाले. शिवसेनेने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. मी त्यावर काहीही टाका करणार नाही असं स्पष्ट करत त्यांनी संघर्ष टाळण्याची भूमिका व्यक्त केली.

भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात जाणं काहीही गैर नाही. त्यांची विचारसरणी मला समजून घ्यायची आहे असंही ते म्हणाले. संघाची काही पुस्तकं मी विकत घेतली आहेत असंही त्यांनी सांगितलं.

First published: October 13, 2019, 4:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading