राज्यपालांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांवर नारायण राणेंचा तीव्र शब्दात 'प्रहार'

राज्यपालांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांवर नारायण राणेंचा तीव्र शब्दात 'प्रहार'

राजभवन यांचे अनन्य साधारण महत्व आहे. खासदारकीची शपथ घेतलेल्या संजय राऊतला माहित नाही काय?

  • Share this:

मुंबई, 19 एप्रिल: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आक्रमक शब्दांमध्ये अप्रत्यक्षपणे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.  'राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है,' असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांच्या या खरमरीत टीकेनंतर आता  भाजप नेत्याने पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी राज्यपाल यावर भाष्य करणारे टीकात्मक ट्वीटला माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी तीव्र शब्दांत उत्तर दिलं आहे.

राज्यपाल आणि राजभवन यांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे खासदारकीची शपथ घेतलेल्या संजय राऊतला माहीत नाही काय? असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे. सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत. सत्ता चंचल असते आज आहे उद्या नाही. समझने वालों को इशारा काफी है! @rautsanjay61 असे ट्वीट करून नारायण राणे यांनी संजय राऊत यांना इशारा दिला आहे.

राजभवन यांचे अनन्य साधारण महत्व आहे. खासदारकीची शपथ घेतलेल्या संजय राऊतला माहित नाही काय?

‘संज्या राऊत’ म्हणजे डोळे बंद करून दूध पिणारी ‘मांजर’

दरम्यान, दोन दिवस आधी भाजप नेते आणि माजी खासदार निलेश नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेची बातमी शेअर करत खोचक टीका करणारं ट्वीट केलं होतं. 'संज्या ती मांजर आहे जी डोळे बंद करून दूध पिते पण तिला वाटतं मी जगाला दूध पिताना दिसत नाही. आत टाकायचा यांनीच आणि सुटला म्हणून पेढे वाटायचे पण यांनीच, असे म्हणत टीका केली आहे.

संकलन, संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 19, 2020, 10:38 PM IST

ताज्या बातम्या