ठाकरे सरकारची 'अशी ही बनवाबनवी', आरे कारशेड किरीट सोमय्यांचा आरोप

ठाकरे सरकारची 'अशी ही बनवाबनवी', आरे कारशेड किरीट सोमय्यांचा आरोप

महाविकासआघाडीचे सरकार हे डोळ्यात धूळफेक करत असल्याचे सोमय्या यांनी एका व्हिडीओद्वारे सांगितले आहे.

  • Share this:

मुंबई,13 डिसेंबर: मुंबईतील आरे कारशेडच्या मुद्यावरून भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. शिवसेना या प्रकरणी बनवाबनवी करत असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. महाविकासआघाडीचे सरकार हे डोळ्यात धूळफेक करत असल्याचे सोमय्या यांनी एका व्हिडीओद्वारे सांगितले आहे.

महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असून एक समिती देखील नेमली आहे. आता भाजपकडून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. याबाबत शासन निर्णयही काढण्यात आला आहे. 'मेट्रो कारशेडकरता सद्यस्थितीत निश्चित जागेत पर्यावरण समतोल करण्यासाठी उपाय सुचवणे, तसेच सद्य परिस्थितीत वेळेत काम पूर्ण करण्यासाठी उपाय योजना करणे आणि वाजवी किमतीत अन्य पर्याय असल्यास सुचवणे, असे नव्या शासन निर्णयात म्हटले आहे. यावर किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर आगपाखड केली आहे. ठाकरे सरकार बनवाबनवी करत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

दिलेल्या आर्थिक परिस्थितीत वेळेत काम पूर्ण करण्यासाठी सध्याच्या जागेत कोणता पर्याय आहे, हे समितीने सांगायचे आहे. अन्यथा याच ठिकाणी कारशेडचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने पर्यावरण समतोल करण्यासाठी काय पावले उचलायची हे सूचवायचे आहे, असे तत्कालीन फडणवीस सरकारने हे सगळेच केले होते, असे सोमय्या यांनी सांगितले. एवढेच नाही तर कोर्टानेही ते मान्य केले आहे. मग ही धूळफेक का? असा सवाल सोमय्या यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

दरम्यान, महाविकासआघाडीचे सरकार येताचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडच्या कार्यक्रमाला स्थगिती दिली आहे. तर आरेमधील मेट्रो कारशेड संदर्भात ठाकरे सरकराने नवीन समिती नेमली. समितीला पंधरा दिवस दिले आहेत. यामध्ये समिती कारशेडसाठी पर्यायी जागा शोधणार आहे. जर पर्यायी जागा उपलब्ध झाली नाही तर पर्यावरण समतोल राखण्यासाठी काय पवाले उचलायची हे ही समिती सुचवणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 04:15 PM IST

ताज्या बातम्या