शिवसेना नेत्यानं 250 कोटी लाटल्याचा आरोप, किरीट सोमय्यांकडून ED कडे पुरावे सादर

शिवसेना नेत्यानं 250 कोटी लाटल्याचा आरोप, किरीट सोमय्यांकडून ED कडे पुरावे सादर

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढवल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 23 डिसेंबर: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांना मनी लॉड्रिंग प्रकरणी एमएमआरडीएने (MMRDA) दिलासा दिला आहे. मात्र, भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somayya)यांनी प्रताप सरनाईक यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढवल्या आहेत.

'प्रताप सरनाईक यांनी सुमारे 250 कोटी रुपये लाटले असून विहंग हाऊसिंग स्किममध्ये मोठा घोटाळा केला आहे. त्या कंपनीवर कारवाई देखील झाली होती. आता त्या कंपन्याच अस्तित्वातच नाही आहेत', असा गंभीर आरोप करत भाजप नेते किरीट सोमाया यांनी या घोटाळ्यासंबंधीत महत्त्वाची कागदपत्रे मुंबईतील अंमलबजावणी संचनालयाच्या (Enforcement Directorate, ED) कार्यालयात सादर केले.

हेही वाचा...मराठा आरक्षणाविषयी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय

विशेष म्हणजे स्वत: किरीट सोमाया हे याकरता इडी कार्यालयात आले होते. हा मोठा घोटाळा असून प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील किरीट सोमय्या यांनी केली.

प्रताप सरनाईक यांच्या नावाने 112 सातबारा (7/12) उतारे आहेत. त्यांनी कंपनीचं नाव देखील बदललं होतं. जप्त केलेल्या मालमत्तेचं नाव सातबारामध्ये नाही, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी EDच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. तर प्रताप सरनाईक यांना MMRDA टॉप्स सिक्युरीटी प्रकरणी दिलेल्या दिलासा मुद्दयावर सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली.

किरीट सोमय्या म्हणाले, एमआयडीए काय कारनामे करतात, हे आपण कांजुरमार्ग कारशेडमध्ये पाहिले. एमएमआरडीए ठाकरे सरकारच्या सचिवासारखे काम करते, अशी खोचक टीका सोमय्यांनी केली.

दरम्यान, आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक दुसऱ्यांदा ED चौकशीला सामोरे गेले होते. दुपारी 12 च्या दरम्यान आलेला विंहग 5 वाजता ED कार्यालयाबाहेर पडला. ED नं त्याची 5 तास चौकशी केली. या आधी ED त्याची 6 तास चौकशी केली होती. तर पूर्वेश सरनाईक याला देखील चौकशीला बोलावले होते. मात्र तो चौकशीला हजर राहिला नाही. तसेच 21 डिसेंबरला प्रताप सरनाईक यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश ED ने दिले होते. मात्र ते ही चौकशीला हजर राहिले नव्हते. त्यामुळे प्रताप आणि पुर्वेश या दोघांना ED पुन्हा समन्स पाठवण्याच्या तयारीत आहेत.

हेही वाचा...लॉकडाऊनमध्ये कोणत्या नेत्याने केली सर्वाधिक मदत; राहूल गांधींच्या नावाचा समावेश

प्रताप सरनाईक यांना दिलासा...

दरम्यान, प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयांवर ईडीने छापे टाकले होते. यात टॉप सिक्युरिटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा दावा EDने केला होता. या प्रकरणी MMRDA मधील बनावट टॉप्स सुरक्षा रक्षकांची अर्धी रक्कम प्रताप सरनाईकांना जात होती, असा दावा ED ने न्यायालयासमोर केला होता. परंतु, टॉप्स सिक्युरिटीच्या 175 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे MMRDA चा अहवाल सादर करण्यात आला होता. यात MMRDA ने दाखल केलेल्या अहवालात कोणताही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा उल्लेख केलेला नाही.

Published by: Sandip Parolekar
First published: December 23, 2020, 7:20 PM IST

ताज्या बातम्या